अहिल्यानगर-अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती या उपबाजारात भानुदास एकनाथ कोतकर (Bhanudas Kotkar) असे नाव देण्यात आले होते. हे नाव हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिले आहे. जिल्हा उपनिबंधकांना असाच आदेश दिले होता. परंतु तो बाजार समितीने पाळला नव्हता. त्याविरोधात अमोल येवले हे उच्च न्यायालयात (High Court) गेले होते.
नेप्ती उपबाजार समितीत आवारास गेल्या वर्षी भानुदास एकनाथ कोतकर यांचे नाव देण्यात आले होते. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट 2024 रोजी हा नामकरण सोहळा झाला होता. त्यानंतर अमोल येवले व प्रमोद ठुबे यांनी लगेच निंबधक कार्यालयात तक्रार दाखल केली होती. लांडे खूनप्रकरणात जन्मठेप झालेल्या कोतकर यांचे नाव बाजार समितीला दिल्याचा आक्षेप घेतला होता. त्या प्रकरणी तालुका उपनिबंधकांनी चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हा उपनिंबधकांना सादर केला होता. तसेच पण मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा उपनिंबधक गणेश पुरी यांना आदेश काढून नाव हटविण्यासाठी सांगितले होते.
मुंबई महानगरपालिका; किती उमेदवार मराठी?, गुजराती अन् साऊथ इंडियनचीही मोठी संख्या
उपनिंबधकांचा आदेश काय ?
शासनाच्या 1987 च्या परिपत्रकानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नामकरणाबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारास व उपबाजार समित्यांना राजकीय व सामाजिक पुढाऱ्यांची नावे देण्यात येत होती. त्यामुळे नाकरणाचा मुद्दा 1987 मध्ये उपस्थित झाला होता. त्यावेळी पणन संचालकांनी बाजार समित्यांना राजकीय व सामाजिक पुढाऱ्यांची दिलेले नावे रद्द करण्याचा आदेश काढला होता. त्याची अंमलबजावणी करणे बाजार समित्यांना बंधनकारक आहे. त्याने नेप्ती उपबाजारास भानुदास एकनाथ कोतकर असे नाव दिलेले आहे असल्याने ते तत्काळ रद्द करावे व फलक काढण्यात यावा, असे आदेश उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिले होते.
मोठी बातमी! भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड
आदेशाची अंमलबजावणी नाहीच
परंतु या आदेशाची अंमलबजावणी बाजार समितीने केली नव्हती. त्याविरोधात अमोल येवले हे उच्च न्यायालयाच्या खंडपीठात गेले होते. येवले यांच्या याचिकेवर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व हितेन वणेगावकर यांनी नाव हटविण्याचे आदेश दिले आहेत.
तक्रार करणारे अमोल येवले भाजपचे नगरसेवक
या प्रकरणी तक्रार करणारे अमोल येवले तेव्हा शिवसेनेचे माजी नगरसेवक होते. गेल्या महिन्यात ते भाजपात दाखल झाले आणि नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत.
