Download App

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ठाकरेंना मिळाला तगडा उमेदवार; कॉंग्रेसचे गुळवे ठाकरे गटात

Sandeep Gulave यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. सुभाष देसाई आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षात प्रवेश झाला.

Sandeep Gulave Announced for Nashik Teachers Constituency after Entered in UBT : नाशिकचे कॉंग्रेसचे नेते अॅड. संदीप गुळवे ( Sandeep Gulave ) यांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये ( UBT ) प्रवेश केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवसेनाभवन दादर येथे हा पक्षात प्रवेश झाला. त्यानंतर लगेचच ठाकरे गटाकडून नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ( Nashik Teachers Constituency ) त्यांना उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी ठाकरेंना तगडा उमेदवार मिळाला आहे.

कोण आहेत अॅड. संदीप गुळवे?

अॅड. संदीप गुळवे हे नाशिकमधील काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्यांचे शिक्षण बीए एलएलबी झालेलं असून त्यांनी नाशिक जिल्हा परिषदेचे 2012 ते 2017 या काळामध्ये सदस्य होते. तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून ओळख असलेल्या मराठा विद्या प्रसारक मंडळाचे ते संचालक आहेत. तसेच नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून देखील त्यांनी भूमिका बजावलेली आहे. जिल्ह्यातील विविध सहकारी, शिक्षण व कृषी संघटनांशी त्यांच्या जवळचा संबंध आहे. मात्र आता त्यांनी काँग्रेस पक्षातून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर लगेचच ठाकरे गटाकडून त्यांना नाशिक शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे.

पहिल्या दिवशी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ची जबरदस्त कमाई; क्रिकेटवरच्या कथेला दमदार प्रतिसाद

दरम्यान गुळवे यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, संदीप गुळवे आणि शिक्षक बंधू यांचं स्वागत करतोय. आज संध्याकाळनंतर एक्सिट पोल प्रकार समोर येईल. त्याअगोदरच पंतप्रधान ध्यान करत आहेत. त्यामुळेच त्यांनी आताच डोळे बंद केले आहेत. त्यांना आजचा हा शिवसेनेचा कार्यक्रम दिसत असेल नाशिक शिक्षक मतदार संघात आपण संदीप गुळवे यांना उमेदवारी देऊन महाविकास आघाडी म्हणून ही लागा लढवत आहोत.

इस्त्रायल हमास युद्ध थांबणार? इस्त्रायलच्या ‘त्या’ प्रस्तावाची अमेरिकेने केली घोषणा

मागच्या वेळी आपण शिवसेना उमेदवार निवडून आणला होता. संपूर्ण शिवसेनेची यंत्रणा काम करत होती आणि त्यानंतर किशोर दराडे जिंकले. ह्या जागेवर शिवसेनेचा अधिकार आहे. कोणी सोडून गेला असेल यांचा काही होणार नाही.शिवसेना ४ अक्षरात ताकद आहे यामागे कोणीही उभा राहात आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आपण संदीप गुळवे यांना नाशिक शिक्षक मतदार संघाची उमेदवारी देत आहोत, त्यांनी सांगितलं त्यांचा पक्ष प्रवेश करून घ्या.. ते आपले उमेदवार असतील. असं राऊत म्हणाले.

follow us