Download App

Sanjay Raut : बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, बावनकुळेंचा व्हिडिओ.. राऊतांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट!

Sanjay Raut : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा सहकारी सलीम कुत्ताबरोबरील पार्टी प्रकरणात ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर अडचणीत सापडले. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. त्यानंतर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणात भाजपवर गंभीर आरोप करत नवा ट्विस्ट आणला आहे. सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा व्हिडिओ चर्चेत आल्याने सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आली, अशी टीका राऊत यांनी केली.

संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आज राऊत यांनी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भाजपवर घणाघाती टीका करत  गंभीर आरोप केले. सुधाकर बडगुजर यांच्यावर काहीही कारण नसताना कारवाई केली जात असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.  बावनकुळे यांचा मकाऊ येथील व्हिडिओ बडगुजर कुटुंबाने दिला म्हणून बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की बावनकुळेंचा तो व्हिडिओ बडगुजर यांनी दिलेला नाही. संघपरिवार विशेषतः नागपुरवाल्यांना हे चांगलं माहिती आहे की तो व्हिडिओ कसा आला, असा टोला राऊत यांनी लगावला.

Sanjay Raut : ‘भाजपाच्या जावयाला मुंबई गिळायचीय’ अदानींविरोधात रस्त्यावर उतरण्याचा राऊतांचा इशारा

भाजपाच्याच एका पदाधिकाऱ्याने पार्टी आयोजित केली होती. अन्य पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. त्याच्या पार्टीला सुधाकर बडगुजर यांच्यासह अन्य पदाधिकारी गेले होते. त्या पार्टीला सलीम कुत्ता देखील गेला होता. पण, त्या गुन्हेगाराला पॅरोल कुणी दिला? त्यावेळी गृहमंत्री कोण होते? असे सवाल करत या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली.

दरम्यान,  भाजप आमदार नितेश राणे यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता आणि ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा गंभीर आरोप केला होता. इतकेच नाही तर त्यांनी सभागृहात या पार्टीचा फोटो दाखवत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. भाजप आमदार आशिष शेलार, मंत्री दादा भुसे यांनीही या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय गंभीर असल्याचे सांगत या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

दाऊदच्या हस्तकासोबत ठाकरेंचा शिलेदार; राणेंचे आरोप अन् फडणवीसांनी घोषित केली SIT

Tags

follow us