‘महाराष्ट्रातले सगळे भिकारी शिर्डीत जमा झाले, संस्थानकडून दिले जाणारे मोफत जेवण बंद करा’, सुजय विखेंचे मोठे वक्तव्य

Sujay Vikhe Patil : शिर्डीच्या प्रसादालयात साईबाबा संस्थानकडून (Saibaba Temple) भक्तांना दिले जाणारे मोफत जेवण बंद करावे. त्यासाठी थोडेफार शुल्क आकारले जावे. हे पैसे मुलांचे दर्जेदार शिक्षण आणि त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी खर्च करावे, अशी सूचना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केली. तसेच साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारांहून अधिक […]

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : शिर्डीच्या प्रसादालयात साईबाब संस्थानकडून (Saibaba Temple) भक्तांना दिले जाणारे मोफत जेवण बंद करावे. त्यासाठी थोडेफार शुल्क आकारले जावे. हे पैसे मुलांचे दर्जेदार शिक्षण आणि त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी खर्च करावे, अशी सूचना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केली. तसेच साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारांहून अधिक लोकांना मोफत अन्नदान करत आहे. त्यामुळे शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढली. महाराष्ट्रातले सगळे भिकारी शिर्डीत जमा झाले, असंही ते म्हणाले.

‘…तर ते इतके दिवस गप्प का?’, रुपाली चाकणकरांचा सुरेश धसांवर निशाणा 

शिर्डी परिक्रमा उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात विखे बोलत होते. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, इतर अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थितांपैकी अनेकांनी विखे यांच्या मागणीचे टाळ्या वाजवून स्वागत केले. मात्र, आध्यात्मिक क्षेत्रातील काहींनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. शिर्डी संस्थातर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळेबाबत बोलताना विखे यांनी हे वक्तव्य केले.

‘…तर धनंजय मुंडेही गुन्ह्यात येतील, ते काय ब्रह्मदेव नाहीत’; सुरेश धस यांचा इशारा 

ते म्हणाले, शिर्डी संस्थानतर्फे मोफत भोजन दिले जाते. अख्खा देश इथे येऊन मोफत जेवण करतो. त्यामुळे शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढली, असंही ते म्हणाले. महाराष्ट्रातील भिकारीही येथे गोळा झाले आहेत. खरे तर शिर्डीला येणाऱ्यांना 25 रुपये देऊन जेवण करणं परवडणारे आहे. त्यानुसार शुल्क आकारण्याचा निर्णय घ्यावा. हा पैसा शिक्षणावर खर्च करा. या भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. त्यांच्या भविष्याची तयारी करून घेता आली पाहिजे. शिर्डीत कोट्यवधी रुपये खर्चून शैक्षणिक संकुल बांधण्यात आले. मात्र, केवळ शाळांच्या इमारती चांगल्या बांधून जमणार नाही. तेथे चांगले शिक्षक आणण्यासाठी पैसे खर्च करा. इंग्रजीचे शिक्षक जरर इंग्रजी विषय मराठीतून शिकवत असलील तर काय उपयोग?, असा सवाल त्यांनी केला.

जे पैसे अन्नदानासाठी खर्च होतात, ते पैसे आमच्या मुला-मुलींच्या भविष्यावर आणि शिक्षणावर खर्च करावा. तुम्हीच ठरवा, कोणी विरोध केला तर बघू त्याचे काय करायचे. आपण लवकरच यााठी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत संबंधितांची बैठक घेऊ, असे विखे म्हणाले.

दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी सुजय विखे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले, येथे शिक्षणाबाबत काही अडचणी असतील तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्कीच मदत करतील. भाविकांना मोफत प्रसाद वाटपाला विरोध करणे आणि त्यांना भिकारी म्हणणे हे दुर्दैवी आहे.

Exit mobile version