‘…तर ते इतके दिवस गप्प का?’, रुपाली चाकणकरांचा सुरेश धसांवर निशाणा

‘…तर ते इतके दिवस गप्प का?’, रुपाली चाकणकरांचा सुरेश धसांवर निशाणा

Rupali Chakankar : संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंडेंवर कोणताही कारवाई केली नाही. यावरून आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी परभणीतील सभेत मुंडेंसह अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भाष्य केलं.

‘…तर धनंजय मुंडेही गुन्ह्यात येतील, ते काय ब्रह्मदेव नाहीत’; सुरेश धस यांचा इशारा 

संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. त्यांना गृहखात्यापेक्षा सखोल माहिती होती तर ते इतके दिवस गप्प का होते? असा सवाल चाकणकर यांनी केला.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी (4 जानेवारी) परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर जाहीर सभेत बोलतांना सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत धनंजय मुंडे यांना बीडचे पालकत्व देऊ नये, अशी मागणी केली होती. आत्तापर्यंत बीड आणि परळी जिल्ह्यात खुनांची मालिका झाली, या हत्या कुणी केल्या? हत्येचे सूत्रधार कोण आहेत? याचा शोध घ्या, आका जल्दी करलो तयारी, निकलेंगी तेरी जेलवारी असं म्हणत मुंडेंना मंत्रिमंडळात का ठेवलं आहे? अजितदादा, तेरा वादा क्या हुआ रे, असा बोचरा सवाल धस यांनी केला होता.

संतोष देशमुख हत्याकांड: सांगळे, आंधळे, घुले गुजरातला कसे गेले ? कुठे-कुठे लपले, कुणी मदत केली? 

तर ते इतके दिवस गप्प का?
त्यानंतर आता चाकणकर यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटलं की, स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आमदार सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. परभणीच्या मोर्चामध्ये आदरणीय अजित दादांना क्या हुआ तेरा वादा…म्हणून प्रश्न विचारला. तुम्ही न्यायाच्या बाजूने आवाज उठवत आहात पण त्यामध्ये तुमचा राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. जर सुरेश धस यांना गृहखात्यापेक्षा सखोल माहिती होती तर ते इतके दिवस गप्प का होते. आजपर्यंत तुमचा संजय सिंघानियाच होता का ?, असा सवाल चाकणकर यांनी केला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube