Download App

Sujay Vikhe यांच्याकडून लोकसभा, विधानसभेची पायाभरणी; विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी

  • Written By: Last Updated:

Sujay Vikhe : भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी राज्यात होणाऱ्या आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांसाठी पायाभरणी केली जात आहे. कारण अगोदर लोकसभा आणि त्यानंतर मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे यांच्या विधानसभेसाठी त्यांच्या विकासकामांना देखील वेग आला आहे. त्यांच्याकडून सध्या अनेक विकासकामांचे उदघाटन केले जात आहे.

IND vs AUS Final: भारताच्या पराभवानंतर अनुष्का अन् विराटच्या ‘त्या’ फोटोची जोरदार चर्चा !

यात भर म्हणजे नुकतेच विखे यांनी स्थानिक विकास निधीतून अहमदनगर शहरातील विकास कामांकरिता भरघोस निधी प्राप्त करून दिला आहे. विखेंनी खासदार निधीतून तब्बल एक कोटी 40 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करून दिला आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी नगर दक्षिण लोकसभा निवडणुका पाहता राजकीय नेतेमंडळींकडून जनतेची कामे तसेच समस्यांना प्राधान्य दिले जात असल्याचे देखील दिसून येत आहे.

IND vs AUS Final : …म्हणून टीम इंडियाचा पराभव झाला; नेटकऱ्यांकडून अहमदाबादचे प्रेक्षक टार्गेट

येत्या काळात निवडणुका होणार आहे. मात्र नगर शहरातील अनेक विकासकामे निधी अभावी प्रलंबित आहे. तर काही कामे अद्यापही रखडलेली आहे. काही ठिकाणी कामांना मंजुरी मिळत असली तरी ठेकेदार कामे घ्यायला पुढे येत नाहीत. जुन्याच कामांची लाखोंची बिले महानगरपालिकेने तिजोरीतील खडखडाटा मुळे अदा केलेली नाहीत. यामुळे विकासकामांना ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे.

…तर काहींच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं; कपिल देवच्या आमंत्रणावरून राऊतांचा निशाणा

मात्र असे असताना खासदार सुजय विखे यांनी नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने आपले पाऊले सुरूच ठेवली आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून अहमदनगर शहरातील विकास कामांकरिता भरघोस निधी प्राप्त झाला आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये खासदार निधीतून 90 लक्ष आणि पर्यटन विकास मधून 50 लक्ष, असा एकूण 1 कोटी 40 लक्ष रुपयांचा भरीव निधी विविध ठिकाणी सभामंडपाच्या बांधकामांसाठी मंजूर करून दिला आहे.

यावेळी बोलताना खासदार विखे म्हणाले, एक लोकप्रतिनिधी या नात्याने विविध विकासकामांसाठी मी सदैव कटिबध्द आहे. तसेच यापुढेही अशा अनेकविध कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील भूमिका पार पाडेल असे सांगून उपस्थित सर्वांचे सुजय विखे यांनी आभार मानले.

शहरातील या ठिकाणी विकासकामे होणार…

खासदार निधीतून प्रभाग क्र. 2 येथील वैष्णवी माता मंदिर, प्रभाग क्र. 7 मधील विजयनगर येथे मारुती मंदिर परिसर, प्रभाग क्र. 8 मध्ये दातरंगे मळा येथील पर्जन ईश्वर महादेव मंदिर परिसर, प्रभाग क्र. 5 मध्ये समता चौक येथील हनुमान मंदिर व महादेव मंदिर परिसर, प्रभाग क्र. 9 मध्ये सिद्धी बागेतील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसर, प्रभाग क्र. 16 मध्ये शिवाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, प्रभाग क्र. 16 मध्ये ओंकार नगर येथील हनुमान मंदिर, प्रभाग क्र. 16 मध्ये विश्वनराजे मराठा मंदिर,

तसेच प्रभाग क्र. 17 मध्ये शास्त्रीनगर येथील श्री दत्त मंदिर, प्रभाग क्र. 17 मध्ये मोहिनीनगर येथील श्री गणपती मंदिर आदी ठिकाणी आणि पर्यटन विकास मधून प्रभाग क्र. 16 मध्ये बालाजी कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, प्रभाग क्र. 16 मध्ये पाच गोडाऊन येथील दत्त मंदिर, प्रभाग क्र. 17 मध्ये एकता कॉलनी देवी रोड येथील गणपती मंदिर, प्रभाग क्र. 17 मध्ये मोहिनी नगर पाण्याची टाकी येथील हनुमान मंदिर, प्रभाग क्र. 17 मध्ये शास्त्रीनगर येथील हनुमान मंदिर आदी ठिकाणी सभामंडप बांधकाम करणेसाठी सदरील निधी मंजूर झाला आहे.

Tags

follow us