Sunil Tatkare on Balasaheb Nahata in Ahmednagar NCP Meeting : मी नगर जिल्ह्यात पक्षाच्या जिल्हाध्यक्षांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचा आढावा घेतला. बाळासाहेब (Balasaheb Nahata) त्यावर मी खुश नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी स्पष्टपणे सांगतो पक्षाला जे अपेक्षित आहे. ते काम जिल्हाध्यक्षांनी करायलाच पाहिजे. यामध्ये जराही दुमत असण्याचे कारण नाही. अशी नाराजी सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी व्यक्त केली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आढावा बैठकीचे (NCP Meeting) आयोजन नगर जिल्ह्यात करण्यात आले होते. या बैठकीला सुनील तटकरे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.
Pushpa 2: अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ची प्रदर्शित होण्याची तारीख अखेर ठरली, ‘या’ दिवशी होणार रिलीज
पुढे बोलताना तटकरे म्हणाले की, या निवडणुकीला महायुती म्हणून आपण पहिल्यांदाच सामोरे जात होतो. पक्ष म्हणून आपल्यासमोर आव्हान होतं ते म्हणजे शिवसेनेच्या आणि भाजपच्या मतदारांना धनुष्यबाण आणि कमळा ऐवजी घड्याळाच्या चिन्हावर मतदान करायला सांगायचं होतं. हे मतदारांच्या मनावर बिंबवण्यात काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं.
श्रीगोंद्याला नागवडे कुटुंबातीलच आमदार मिळणार; अनुराधा नागवडेंनी फुंकले रणशिंग
पण या निवडणुकीत एक वेगळंच वातावरण निर्माण झालं. ज्याचे निकाल आपण नुकतेच पाहिले. मात्र यापूर्वी देखील लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळे निकाल अनुभवायला मिळाले आहेत. पण पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्षाचं धोरण, निती आणि नेतृत्व ज्या पद्धतीने काम करतं ते समाजापर्यंत पोहोचवण्या पोहोचवण्यात यश आलं तर अपेक्षित असलेले यश नक्की मिळतं.
लोकसभेचा गुलाल हुकला पण विधानसभेचा गुलाल आपलाच; जगतापांनी फुंकले रणशिंग
त्यामुळे आज जेव्हा मी नगर जिल्ह्यात पक्षाच्या जिल्हाध्यक्षांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचा आढावा घेतला. बाळासाहेब त्यावर मी खुश नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी स्पष्टपणे सांगतो. पक्षाला जे अपेक्षित आहे. ते काम जिल्हाध्यक्षांनी करायलाच पाहिजे. यामध्ये जराही दुमत असण्याचे कारण नाही. ते ध्येय समोर ठेवूनच आपल्याला वाटचाल करायचे आहे.
https://www.youtube.com/live/pfi10vRrgV0?si=rxOElJEdtB4nJo8L
त्यामुळे मी जिल्हाध्यक्षांसह सर्वच सेलच्या अध्यक्षांना सांगतो की, तुम्ही सर्वांनी मिळून जबाबदारीचे भान लक्षात घेत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षाची बळकटी करायची आहे. यामध्ये तुम्ही आपण लोकांमध्ये जाण्यात का कमी पडलो? त्याचा आत्मपरीक्षण करावे. व विरोधकांनी केलेला प्रचार कसा चुकीचा होता हे कार्यकर्त्यांनी जनतेला सांगणं गरजेचं आहे. असं म्हणत तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांना चांगलेच धारेवर धरले.