श्रीगोंद्याला नागवडे कुटुंबातीलच आमदार मिळणार; अनुराधा नागवडेंनी फुंकले रणशिंग

श्रीगोंद्याला नागवडे कुटुंबातीलच  आमदार मिळणार; अनुराधा नागवडेंनी फुंकले रणशिंग

Shreegonda Vidhansabha Anuradha Nagvade claim for MLA : येणाऱ्या विधानसभेमध्ये श्रीगोंद्यात (Shreegonda Vidhansabha) आमदार नागवडे (Anuradha Nagvade) कुटुंबातीलच आमदार असेल असा विश्वास यावेळी अनुराधा नागवडे यांनी व्यक्त केला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आढावा बैठकीचे आयोजन नगर जिल्ह्यात करण्यात आले होते. त्यामध्ये त्या बोलत होत्या.

बंगाल ते बिहार… किंकाळ्या अन् आक्रोश; ‘त्या’ रेल्वे अपघातांनी हादरला अख्खा देश

पुढे बोलताना त्याम्हणाल्या की, लोकसभा झाली आहे .आता आपल्याला त्याविषयी बोलायचं नाही तर आपल्याला आता विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आपण आढावा बैठक घेत आहोत. प्रत्येक तालुक्यात आपण उमेदवार जरी उभा केला तरी त्यांना निवडून आणू असा शब्द अजित दादांना कार्यकर्त्यांनी दिला पाहिजे. महाराष्ट्राला भूगोल आहे मात्र नगर जिल्ह्याला इतिहास आहे आणि आज इतिहास आम्ही नक्कीच जिवंत ठेव.

मुलीच्या ऍडमिशनसाठी बाप निघाला वाटेतच काळाचा घाला…

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आढावा बैठकीचे आयोजन नगर जिल्ह्यात करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यासह अनुराधा नागवडे संग्राम जगताप यांच्यासह अनेक जण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लोकसभा निवडणुकींवरती जास्त भाषण न करता येणारा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनुराधा नागवडे यांनी एक प्रकारे विधानसभेचे रणसिंगच फुंकले.

यावेळी बोलताना अनुराधा नागवडे म्हणाले की, लोकसभेत संविधान बदलला जाईल असा एक अजेंडा राबवला गेला मात्र आम्ही अजिबात संविधान बदलणार नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा शेती किंवा शिक्षणाचे प्रश्न असू या प्रश्नांवरतीच आम्ही विधानसभेत उठवणार आहोत.. ग्रामीण भागातील प्रश्न जाणणारेच माणसं विधानसभेत गेले तरच आपले प्रश्न सोडवले जाणार आहेत असं नागवडे यांनी म्हटले. जर आपण विधानसभेत चुकलो पण महाराष्ट्र पुन्हा एकदा मागे जाईल असे यावेळी बोलताना नागवडे यांनी म्हटले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज