बंगाल ते बिहार… किंकाळ्या अन् आक्रोश; ‘त्या’ रेल्वे अपघातांनी हादरला अख्खा देश

बंगाल ते बिहार… किंकाळ्या अन् आक्रोश; ‘त्या’ रेल्वे अपघातांनी हादरला अख्खा देश

Kanchanjunga Express Accident : पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी रेल्वे स्टेशनजवळ काल (Kanchanjunga Express Accident) एक मोठा रेल्वे अपघात झाला. सियालदह येथे जाणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला एका मालगाडीने (Train Accident) पाठीमागच्या बाजूने जोराची धडक दिली. या धडकेने रेल्वेचे दोन डबे रुळावरून खाली घसरले. या दुर्घटनेत आता पर्यंत १५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच साठ पेक्षा जास्त प्रवासी (West Bengal) जखमी झाले आहेत. मागील काही वर्षांत असे अनेक रेल्वे अपघात घडले असून या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशाच काही मनाला चटका लावून जाणाऱ्या रेल्वे अपघातांची माहिती घेऊ या..

एकाच अपघातात 800 लोकांचा मृत्यू

६ जून १९८१ या दिवशी देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात ८०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. बिहारमध्ये (Bihar News) मानसी-सहरसा पॅसेंजर रेल्वे रुळावरून खाली घसरली आणि थेट नदीत जाऊन पडली.

बालासोरमध्ये रेल्वेचा विचित्र अपघात

ओडिशातील बालासोरमध्ये मागील वर्षातील (Balasore Train Accident) जून महिन्यातच मोठा रेल्वे अपघात झाला होता. ही दुर्घटना अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. चेन्नई येथून हावडाकडे जाणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेस लूप लाईनमध्ये उभ्या असलेल्या एका मालगाडीला धडकली होती. या धडकेनंतर कोरोमंडलचे काही डबे रुळावरून घसरून शेजारच्या रेल्वे लाईनवरून जाणाऱ्या यशवंतपूर हावडा एक्सप्रेसला धडकले होते.

या भीषण अपघातात २९६ प्रवासी मारले गेले होते. सगळीकडे किंकाळ्या आणि आर्त रुदन ऐकू येत होते. या दुर्घटनेत १२०० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले होते. चुकीचा सिग्नल दिला गेल्याने हा अपघात घडला असे नंतर सांगण्यात आले होते.

पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीची धडक, पाच जणांचा मृत्यू

इंदोर पटणा एक्सप्रेस रेल्वे अपघात

सन २०१६ मधील नोव्हेंबर महिन्यात इंदोर पटणा एक्सप्रेसला उत्तर प्रदेशात मोठा अपघात झाला होता. या एक्सप्रेसचे अनेक डबे रुळावरून खाली घसरले. या अपघातात १४६ लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातात काही डबे एकमेकांवर जोरात आदळले होते.

झारग्राममध्ये ज्ञानेश्वरी एक्सप्रेस रेल्वे अपघात

२८ मे २०१० रोजी पश्चिम बंगालमधील झारग्राममध्ये ज्ञानेश्वरी एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात १४६ लोकांचा मृत्यू झाला होता तर २०० प्रवासी जखमी झाले होते. या अपघाता मागे माओवादी बंडखोरांचा हात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

राजधानी एक्सप्रेसच्या डब्यांना नदीत समाधी

सन २००२ मध्ये सुद्धा एक भीषण रेल्वे अपघात घडला होता. कोलकाता येथून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसचे काही डबे धाबी नदीत कोसळले. या अपघातात कमीत कमी १२० प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

मुंबईत घर नको रे बाबा! जगातलं तिसरं महागडं शहर; यादीत टॉप 5 मध्ये दिल्लीचाही नंबर

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट

११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांनी अख्ख्या देशाला हादरवून टाकले होते. रेल्वेत एका पाठोपाठ एक सात स्फोट झाले होते. अतिरेक्यांनी केलेल्या या बाँबस्फोटात तब्बल १८६ प्रवासी मारले गेले होते आणि ७०० प्रवासी जखमी झाले होते. सरकारने या हल्ल्या पाठीमागे पाकिस्तान स्थित गुप्तहेर संस्था आयएसआय आणि लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे म्हटले होते.

अवध असम एक्सप्रेस व ब्रह्मपुत्र मेल धडकल्या

२ ऑगस्ट १९९९ या दिवशी पश्चिम बंगालमधील गैसल भागात अवध असम एक्सप्रेस आणि ब्रह्मपुत्र मेल यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात २८५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तसेच ३१२ प्रवासी जखमी सुद्धा झाले होते.

दोन भरधाव रेल्वे धडकल्या अन्…

सन १९९५ मध्ये आग्रा शहराजवळ झालेल्या रेल्वे अपघातात तब्बल ३०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. आग्रा जवळील फिरोजाबादमध्ये कालिंदी एक्सप्रेस आणि पुरुषोत्तम एक्सप्रेस यांच्यात टक्कर झाली होती. नीलगायींमुळे रेल्वे ट्रॅकवर अडथळा निर्माण झाला होता. यानंतर मागील बाजूने धडक झाली होती. या अपघातात तीनशेपेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube