मुंबईत घर नको रे बाबा! जगातलं तिसरं महागडं शहर; यादीत टॉप 5 मध्ये दिल्लीचाही नंबर

मुंबईत घर नको रे बाबा! जगातलं तिसरं महागडं शहर; यादीत टॉप 5 मध्ये दिल्लीचाही नंबर

Mumbai House Prices : एक लहानसं का होईना पण चार भिंतींचं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. गावखेड्यातली माणूस असो की अस्ताव्यस्त वाढलेल्या महानगरांत राहणारा घराचं स्वप्न असतंच. मोठ्या शहरात घर घेण्याचं स्वप्न मात्र दिवास्वप्न ठरत चाललं आहे. मुंबई, दिल्ली आणि पुण्यात घर घेताना सर्वसामान्यांच्या नाकीनऊ येतात इतक्या घरांच्या किंमती वाढल्या आहेत. आताही असाच एक अहवाल आला आहे ज्यात घरांच्या किंमती सर्वाधिक असणाऱ्या ४४ शहरांच्या यादीत मुंबई आणि दिल्ली शहरं टॉप पाचमध्ये आली आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबई तिसऱ्या तर दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे.

जगात सर्वाधिक महाग घरे असणाऱ्या शहरांच्या यादीत देशाची आर्थिक राजधानी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. नवी दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे. ग्लोबल रियल इस्टेट कन्सल्टन्सी कंपनी नाईट फ्रँकने एक अहवाल जारी केला आहे. या अहवालात जगातील ४४ शहरांची यादी देण्यात आली आहे. या शहरांतील घरांच्या किंमतीत सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे.

‘फेअर प्ले’ प्रकरणी मुंबई, पुण्यात ईडीची छापेमारी; कोट्यवधींचे साहित्य जप्त, परदेशात कसे गेले पैसे ?

सर्वसामान्य माणसांसाठी मुंबईत घर घेणं आता अशक्य कोटीतील गोष्ट झाली आहे. या वर्षातील जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात घरांच्या किमती वाढलेल्या ४४ शहरांच्या यादीत मुंबई तिसऱ्या क्रमांकावर राहिली. तर देशाची राजधानी दिल्ली पाचव्या क्रमांकावर राहिली. मागील वर्षात याच कालावधीत मुंबई सहाव्या तर दिल्ली शहर सतराव्या क्रमांकावर होते.

मुंबई शहरात जानेवारी ते मार्च या तिमाहीत रहिवासी घरांच्या किंमतीत साडे अकरा टक्के वार्षिक वाढ झाली आहे. बंगळुरू शहराच्या रँकिंग मध्ये मात्र घसरण झाली आहे. या यादीत बंगळुरू आता सतराव्या क्रमांकावर पोहोचले आहे. मागील वर्षातील पहिल्या तिमाहीत बंगळुरू सोळाव्या क्रमांकावर होते. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात शहरातील घरांच्या किंमतीत 4.8 टक्के वाढ नोंदविण्यात आली.

धक्कादायक! फक्त दिल्लीच नाही जगातील ‘या’ शहरांनाही पाण्याच्या दुष्काळाचा धोका

महागड्या घरांच्या यादीत मनिला शहर टॉप

सर्वाधिक महाग घरांच्या बाबतीत फिलीपीन्सची राजधानी मनिला शहर पहिल्या क्रमांकावर आहे. या शहरात घरांच्या किंमतीत वार्षिक 26.2 टक्के वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. जपानची राजधानी टोक्यो शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. टोकियो मध्ये घरांच्या किंमतीत वर्षाला 12.5 टक्के वाढ नोंदविण्यात आली. नाईट फ्रँक संस्थेचे नॅशनल डायरेक्टर रिसर्च विवेक राठी यांनी सांगितले की प्राईम प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी जगभरात सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. घरांच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने दिल्ली आणि मुंबई शहरांनी चांगले प्रदर्शन केले आहे. जगातील या 44 शहरांच्या ग्लोबल इंडेक्समध्ये चार टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube