Supa MIDC Encroachment Bulldozer;अहमदनगरः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता प्रशासनही आपल्या कामाला लागले आहे. पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी (Supa Midc) आणि सुप्यामधील अतिक्रमणावर प्रशासनाने शनिवारी दुपारी मोठी कारवाई केली. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. पण यातून आता राजकारणही पेटू लागले आहे. माजी आमदार निलेश लंके (Nilesh lanke) समर्थकांनी या कारवाई थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय (Sujay Vikhe) विखेंकडे बोट केले आहे. विखे यांनी प्रशासनाला हाताशी धरून ही कारवाई करण्यास भाग पाडल्याचा आरोपही लंके समर्थकांनी केला आहे.
भुजबळांचा मोठा खुलासा! म्हणाले, जरांगे पाटलांमुळे माझ्या उमेदवारीला आडकाठी
निवडणुकीनंतर पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी आणि सुपा या ठिकाणची अतिक्रमण काढण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. सुपा शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याची तक्रार यापूर्वी आली होती. त्यावेळेस सर्व अतिक्रमणधारकांना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाच्या वतीने नोटीसा देण्यात आल्या होत्या. अतिक्रमण काढण्यासाठी दीडशे ते दोनशे पोलिस बंदोबस्त मागण्यात आला होता. पोलिस बंदोबस्तामध्ये अतिक्रमणाचे पक्के बांधकामे जेबीसीच्या सह्याने पाडण्यात आले आहेत. तर टपऱ्याही हटविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे.
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे! पंतप्रधान मोदींचा मुक्काम, 80 लाखांचा हॉटेल मालकाला बुर्दंड
लंके देवदर्शनला
परंतु यावर आता निलेश लंके यांचे समर्थक विखे पिता-पुत्रांवर तुटून पडले आहे. सोशल मीडियावर लंके समर्थक विखेंवर टीका करत आहे. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर निलेश लंके हे दोन दिवसांपूर्वी वैष्णवदेवीच्या दर्शनाला गेले आहे. त्यानंतर ही कारवाई झाली आहे. लंकेंनी ही कारवाई करण्यास विरोध केला असता. त्यामुळे प्रशासनाने आताच ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.
अतिक्रमणाधारकांचा गंभीर आरोप
अतिक्रमणधारक शितल बांगर म्हणाल्या, काही कारण नसताना टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत. यात राजकारण करण्यात आहे. हातावर पोट असणाऱ्यांच्या टपऱ्या हटविल्या आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आमच्यावर अत्याचार केला आहे. आचारसंहितेचा काहींना फायदा घेतला आहे. आम्हाला दोन वेळेस नोटीसा दिल्या आहेत. दर वेळेस नोटीस देवून निघून जातात. कारवाई केली जात नाही. काहींची दुकाने काढली नाहीत. केवळ गरिबांची दुकाने काढण्यात आली असल्याचा आरोप शितल बांगर यांनी केला आहे.
अतिफ शेख म्हणाले, गावातील, जिल्ह्याचे राजकारणी आता राजकारण करत आहे. विरोधात मतदान केले म्हणून आमच्यावर कारवाई केली जात आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर अतिक्रमण हटवून घेण्याचे आम्ही निलेश लंके यांना सांगितले होते. तसे ठरले होते. परंतु आताच आमच्यावर कारवाई करण्यात आली आहे.