कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे! पंतप्रधान मोदींचा मुक्काम, 80 लाखांचा हॉटेल मालकाला बुर्दंड

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे! पंतप्रधान मोदींचा मुक्काम, 80 लाखांचा हॉटेल मालकाला बुर्दंड

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी 2023 म्हैसूर दौऱ्यावर होते. त्यावेळी मोदी मुक्कामी असलेल्या हॉटेलचं बिल अद्याप भरलेलं नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणावरून आता हॉटेलनं कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे. एप्रिल २०२३ मध्ये मोदी म्हैसूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मुक्काम केलेल्या हॉटेलचं ८०.६ लाख रुपयांचं बिल अद्याप बाकी आहे. याबाबत हॉटेल मालक चांगलाच आक्रमक झाला आहे.

 

PM मोदींचा मास्टरस्ट्रोक! भाजपने साधले महाराष्ट्र, UP अन् कर्नाटकमधील लोकसभेच्या 100 जागांचे गणित

रेडिसन ब्ल्यू प्लाझा

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि पर्यावरण हवामान बदल मंत्रालयाकडून हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यामध्ये प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे झाल्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी मोदींचा मुक्काम रेडिसन ब्ल्यू प्लाझामध्ये होता. याच हॉटेलचं बिल अद्याप भरण्यात आलं नसल्याचं वृत्त समोर आलं आहे.

63.6 कोटी

राज्य वन विभागाला ९ ते ११ एप्रिल दरम्यान कार्यक्रमाचं आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासाठी लागणारे बजेट ३ कोटी रुपये होतं. वन विभागाला १०० टक्के केंद्रीय सहाय्य देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पर्यावरण आणि वन मंत्रालय आणि एनटीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार अतिशय कमी काळात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी ६.३३ कोटी रुपयांचा खर्च आला.

मोदींच्या मुक्कामासाठी ८०.६ लाख खर्च

यानंतर २२ मार्च २०२४ रोजी आणखी एक पत्र विद्यमान पीसीसीएफ सुभाष मालखेडे यांच्याकडून लिहिण्यात आलं. त्यात एनटीसीएला न भरण्यात आलेल्या रकमेची आठवण करुन देण्यात आली. त्यात रॅडिसन ब्ल्यू प्लाझामधील मोदींच्या मुक्कामासाठी खर्च झालेल्या ८०.६ लाख रुपयांच्या बिलाचाही समावेश होता. पण अद्याप या पत्राला कसलही उत्तर आलेलं नाही.

व्यवस्थापन कायदेशीर कारवाई करणार

सगळ्या घडामोडी सुरु असताना रेडिसन ब्ल्यू प्लाझाच्या महाव्यवस्थापकांनी २१ मे २०२४ रोजी उपवनसंरक्षक बसवराजू यांना पत्र लिहिलं. आमच्या हॉटेलच्या सेवा वापरुन १२ महिने उलटून गेल्यानंतरही बिल भरण्यात आलेलं नाही, याची आठवण त्यांनी करुन दिली. अनेकदा आठवण करुन देऊनही बिलाची रक्कम न भरल्यानं आता १८ टक्के प्रतिवर्ष व्याज दरानं पैसे भरा. व्याज म्हणून १२.०९ लाख रुपये अधिकचे भरा, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. १ जून २०२४ पर्यंत बिल न भरल्यास हॉटेल व्यवस्थापन कायदेशीर कारवाई, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज