Download App

‘जायकवाडीला पाणी सोडलं, पण मुळा-प्रवरा..,’; आमदार गडाखांनी केली ‘ही’ मागणी

Mla Shankrao Gadakh : अनेकांनी विरोध केला, ठराव मंजुर केला पण अखेर जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंपदा विभागाकडून जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयानेही पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने आता मराठवाड्याची तहान भागणार आहे. मात्र, पाणी सोडलं तरीही नगर जिल्ह्यातून एक प्रमुख मागणी करण्यात आली आहे. जायकवाडीला पाणी सोडा पण, मुळा आणि प्रवरा नद्यांवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने द्यावी, अशी मागणी आमदार शंकरराव गडाख(Mla Shankrao Gadakh) यांनी निवदेनाद्वारे केली आहे.

शुभमन गिल गुजरात टायटन्सचा नवा ‘सेनापती’ : हार्दिक पांड्यानंतर मिळाली मोठी जबाबदारी

जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये, यासाठी नगर-नाशिक जिल्ह्यातून मोठा विरोध झाला. लोकप्रतिनिधींनी देखील जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये, अशी भूमिका घेतली होती. मात्र मोठे विरोधानंतरही अखेर जायकवाडीला पाणी सोडण्यात आले. नगर जिल्ह्यातील निळवंडे आणि मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावल्यानंतर आता जिल्ह्यातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. नुकतेच नेवासाचे आमदार शंकरराव गडाख यांनी एक महत्त्वाची मागणी जलसंधारण विभागाकडे केली आहे.

Sa Re Ga Ma Pa 2023 Winner : अल्बर्ट लेप्चा ठरला ‘सा रे ग म प 2023’चा विजेता! म्हणाला, ‘सपना सच हो गया’

समन्याय कायद्याच्या माध्यमातून मुळा व भंडारदरा धरणातून मराठवाड्यातील जायकवाडीमध्ये पाणीसाठा सोडला जात आहे. मात्र हे पाणी सोडत असताना मुळा व प्रवरा नद्यांवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने द्यावी, ही मागणी माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख यांनी जलसंधारण विभागाच्या नाशिक येथील मुख्य अभियंत्यांकडे केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन देखील देण्यात आले आहे.

दगडफेक प्रकरणात अटक केलेल्या ऋषिकेश बेदरेला मी ओळखत नाही; व्हायरल फोटोवर राजेशे टोपेंचा खुलासा

नगर जिल्ह्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येऊ नये, यासाठी मोठा विरोध झाला लोकप्रतिनिधींनी एकत्र येत जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये, यासाठी ठराव देखील मांडला. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला. जलसंपदा विभागाने जायकवाडी धरणासाठी धरण समूहातून पाणी सोडण्याचे प्रत्यक्ष आदेश शनिवारी दिले. त्यानंतर नगर जिल्ह्यातील निळवंडे आणि मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणीसोडण्यात आले.

यंदाच्या वर्षी राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. तसेच जिल्ह्यात देखील पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. काही भागांमध्ये पाऊस झाल्याने धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होता. आगामी काळात पाण्याची गरज भास भासणार असल्याने जायकवाडीला पाणी देण्यास विरोध होऊ लागला. लोकप्रतिनिधींनी देखील रस्त्यावर उतरत ठिकठिकाणी आंदोलने देखील केली. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर जलसंपदा विभागाच्या आदेशाने अखेर जायकवाडीला पाणी सोडण्यात आले आहे.

Tags

follow us