नगर शहरातील प्रसिद्ध व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला

Ahmednagar famous-businessman brutal attack : नगर शहरासह (Ahmednagar) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस धोक्यात येऊ लागली असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. खून, मारहाण, आदी घटनांमुळे शहराची प्रतिमा आधीच मलिन झालेली असताना पुन्हा एकदा नगर शहरात व्यावसायिकावर हल्ला झाला आहे. शहरातील गुलमोहर रोडवरील बन्सी महाराज मिठाईवालेचे संचालक धीरज जोशी (Dhiraj Joshi)यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. […]

नगर हादरलं…शहरातील प्रसिद्ध व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला

Dhiraj Doshi

Ahmednagar famous-businessman brutal attack : नगर शहरासह (Ahmednagar) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस धोक्यात येऊ लागली असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. खून, मारहाण, आदी घटनांमुळे शहराची प्रतिमा आधीच मलिन झालेली असताना पुन्हा एकदा नगर शहरात व्यावसायिकावर हल्ला झाला आहे. शहरातील गुलमोहर रोडवरील बन्सी महाराज मिठाईवालेचे संचालक धीरज जोशी (Dhiraj Joshi)यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Video : सरडाच विसरला आपला रंग… शरद पवारांच्या पक्षाकडून थेट अजितदादांची सरड्याशी तुलना


अहमदनगर शहर
गुलमोहर रोड परिसरातील असलेल्या किर्लोस्कर कॉलनीमध्ये दोन अज्ञात लोकांनी बन्सी महाराज मिठाईवालेचे संचालक धीरज जोशी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्याच्या ठिकाणी एक तलवार आणि गावठी पिस्टल सापडून आले आहे.

हे फर्मांन अजित पवारांच्या बोलण्यासारखे : राज ठाकरे यांची फटकेबाजी

हल्लेखोरांनी पाळत ठेवून लुटण्याच्या हेतूने हा हल्ला केला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हल्लेखोर सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

आमदार संग्राम जगताप यांनी जखमी व्यावसायिक धीरज जोशी यांची रुग्णालयात जावून भेट घेतली आहे. आमदार जगताप यांनी या घटनेचा निषेध केला आहे. बंदुकीसारखे शस्त्र येतात कुठून, याचा पोलिसांना शोध घेतला पाहिजे. सध्या पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या बेकायदेशीर शास्त्रांबाबत कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

Exit mobile version