Download App

उंटावर चक्कर मारताना डाव उलटला; नेमकं काय घडलं? थरकाप उडविणारा व्हिडिओ व्हायरल

Ahmednagar News : आपल्या परिसरामध्ये उंटावर चक्कर मारण्याची लहान मुलांना चांगलीच हौस असते. अनेक ठिकाणी लहान मुलं उंटावरुन चक्कर मारण्यासाठी हट्ट धरत असल्याचं दिसून आलेलं आहे. अशातच लहान मुलं उंटावर चक्कर मारतानाचा डाव उलटला असल्याचं पाहायला मिळालं आहे. लहान मुलं उंटावर असतानाच अचानक उंट उधळला असून उंटाने लहान मुलांना थेट खाली पाडून दिले आहे. ही घटना अहमदनगरच्या कोठला परिसरात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे.

‘आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, 12 जागा अमान्य’; शिंदेंच्या खासदाराची ‘महायुती’त ठिणगी

नेमकं काय घडलं?
अहमदनगरमधील कोठला स्टॅंड परिसरातील जे.जे. गल्लीमध्ये एक युवक आपल्यासोबत उंट घेऊन फिरत होता. तो परिसरातील लहान मुलांना उंटावरुन चक्कर मारुन देत होता. अशातच परिसरातील तीन ते चार लहान मुलांनी उंटावर बसण्याचा हट्ट केला.

शिंदेंची पुन्हा कोंडी! दहावी-बारावीच्या विद्यार्थांचा विचार करत जरांगेंनी जाहीर केला मायक्रो प्लॅन

लहान मुलांच्या हट्टापायी कुटुंबियांनी त्यांना उंटावर बसवले. ज्या ठिकाणाहून ही चिमुकली मुलं उंटावर बसली. त्या ठिकाणापासून काही अंतरावर जाताच उंट माघारी फिरला. मात्र, उंट माघारी फिरत असतानाच अचानक मागून त्याच्या पायाला मागच्या बाजून येत असलेल्या हातगाडीवाल्याचा धक्का बसला. अचानक पायाला जोराचा धक्का बसल्याने उंट घाबरुन गेला. त्यानंतर उंट अचानकपणे उधळला. उंट उधळताच त्याच्यावर बसलेली लहान मुलं थेट खाली पडली आहेत.

नाशिक : पोलीस निरीक्षकांची स्टेशनमध्येच आत्महत्या; सर्विस रिवॉल्वरमधून डोक्यात झाडली गोळी

उंटावरुन तिन्ही लहान मुलं खाली पडताच, त्यातील एका लहान मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेत लहान मुलगा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. उंट उधळला, लहान मुलं खाली पडले त्यानंतर उंटमालकाच्या हातातूनही उंट निसटून उधळत उधळत गेल्याचं चित्र व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर हातगाडी चालक आणि उंटमालकामध्ये किरकोळ वाद झाला पण शहरी भागात वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे प्राणी फिरवणे योग्य आहे का? असा प्रश्न या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे.

follow us

संबंधित बातम्या