बीड पुन्हा हादरलं! अनैतिक संबंधातून भाजपा लोकसभा विस्तारकाचा खून; हत्या करतानाचा व्हिडिओ व्हायरल

बीड पुन्हा हादरलं! अनैतिक संबंधातून भाजपा लोकसभा विस्तारकाचा खून; हत्या करतानाचा व्हिडिओ व्हायरल

BJP Lok Sabha expander murdered in immoral relationship Video goes viral : गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यामध्ये विविध धक्कादायक घटनांनी उच्छाद मांडला आहे. त्यात विशेषत: संतोष देशमुख हत्या प्रकरण, महादेव मुंडे हत्या, शिक्षकाची आत्महत्या तसेच देशमुख हत्येशी संबंधित संशयित महिलेचा खून असो. यासर्व घटनांनंतर आता बीडमधील माजलगाव येथे अनैतिक संबंधातून भाजपा लोकसभा विस्तारकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागेअसलेल्या भाजपा कार्यालयासमोर सोमवारी (दि.15) भर दिवसा तरुणाची हत्या करण्यात आली आहे. बाबासाहेब प्रभाकर आगे (रा. किट्टी आडगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. तर या प्रकरणामध्ये हत्या करतानाचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला आहे. तर हा हत्या करण्यात आलेला मृत तरूण हा भाजपचा लोकसभा बूथ विस्तारक आहे.

नवऱ्याचा अघोरी प्रताप! बायकोच्या गुप्तांगात हळदी-कुंकू भरत लिंबू पिळलं, पुण्यात धक्कादायक घडलं

दरम्यान या प्रकरणामध्ये हत्येनंतर आरोपी स्वत: पोलिसांच्या स्वाधीन झालेला आहे. आरोपी नारायण शंकर फपाळ याने हे कृत्य केले असून तो स्वतःहून शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या पत्नीसोबत बाबासाहेब आगे यांचे अनैतिक संबंध होते. वेळोवेळी सांगून आणि समज देऊनही आगे ऐकत नसल्याने आरोपी दोन महिन्यापासून त्यांच्या मागावर होता.

शेतकऱ्यांना दिलासा, यंदा धो धो कोसळणार पाऊस, हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी

दरम्यान आज त्यांची समोरासमोर भेट झाल्याने कोयत्याने त्यांच्यावर वार करत बाबासाहेब आगे यांची हत्या केली. यानंतर आरोपी स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेने माजलगाव हादरून गेले आहे. हत्या करतानाचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube