Download App

Shirdi : साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिस प्रशासन सतर्क…

Sai Baba temple : शिर्डीतील साईबाबा मंदिराला (Sai Baba Temple) बॉम्बने उडवण्याची धमकी दिली गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.

  • Written By: Last Updated:

Threat to blow up Sai Baba temple with bomb : देशातील प्रसिद्ध शिर्डी साईबाबा मंदिराला (Sai Baba Temple) बॉम्बने उडवण्याची धमकी दिली गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंदिर ट्रस्टने या प्रकरणी शिर्डी पोलि (Shirdi Police) ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ई-मेलमध्ये मंदिरातील समाधी स्थळ आणि द्वारकामाई येथे स्फोटक ठेवले असल्याचा दावा करण्यात आला आहे. माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून ते मंदिर परिसरात तपासणी करत आहेत.

झारखंडच्या दारू घोटाळ्यात अमित साळुंखे गजाआड, महाराष्ट्रातील रुग्णवाहिका घोटाळ्याशीही संबंध 

शिर्डीच्या साईं मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. देशाबरोबरच परदेशातूनही लोक साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. त्यामुळे येथे सुरक्षेची चोख व्यवस्था असते.  दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांना तपासणीनंतरच प्रवेश दिला जातो. दर्शन रांगेच्या प्रवेशद्वारावर साईबाबा संस्थानचे सुरक्षा कर्मचारी पुरुष आणि महिला दोघांचीही कडक तपासणी करतात. अशात मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने पोलिस आणि प्रशासन तपास कार्यात लागले आहेत.

अहमदाबाद विमान अपघात अन् 4 दिवसांनी आजारी पडले 112 पायलट, संसदेत धक्कादायक खुलासा 

धमकीचा ई-मेल ‘भगवंत मान’ नावाने
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवंत मान नावाच्या व्यक्तीने साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव ईमेल आयडीवरून समोर आले आहे. धमकीचा ईमेल मिळताच शिर्डी साईबाबा मंदिर ट्रस्टने तातडीने स्थानिक शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मंदिरात ४ नायट्रिक बॉम्ब ठेवल्याचा दावा
साईमंदिर समाधी स्थळ आणि द्वारकामाईमध्ये ४ नायट्रिक बॉम्ब ठेवण्यात आले आहेत, ते दुपारी १ वाजता निष्क्रिय होतील. त्यामुळं भाविक आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ बाहेर काढावे, असी धमकी दिली आहे.  दरम्यान, शिर्डी पोलिसांनी धमकीचा मेल पाठवणाऱ्या  अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

प्रशासन सतर्क, तपास सुरू
दरम्यान, सध्या शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. धमकी कोठून आली ? ती खरी की खोटी? याचा तपशीलवार शोध घेतला जात आहे. संपूर्ण मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच साईबाबा संस्थानकडूनही भाविकांना घाबरून न जाता सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

follow us