Chagan Bhujbal On OBC Reservation : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी हे ओबीसी समाजाला महत्त्व देतात. तेलंगणात भाजपची सत्ता आल्यास ओबीसी मुख्यमंत्री करु, असे आश्वासन मोदींनी दिले. राहुल गांधीही (Rahul Gandhi) जातनिहाय जनगणना करा, असे म्हणतात. यावरुन ओबीसी समाजाचं महत्त्व अधोरेखित होत असल्याचे म्हणत छगन भुजबळांनी अजितदादांसमोर ओबीसी समाजाच्या आरक्षणाचं महत्त्व ठासून मांडले. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या धडसोड राजकारणावरही थेट हल्लाबोल केला. ते कर्जत येथे आयोजित अजित पवार गटाच्या शिबिरात बोलत होते.
Ajit Pawar : बारामती लढणारच! अजितदादांच्या निर्धारानं वाढलं सुप्रिया सुळेंचं टेन्शन
पवारांच्या भूमिकेवर थेट सवाल
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कर्जतमधील मेळाव्यात बोलताना छगन भुजबळांनी (Chagan Bhujbal) शरद पवारांच्या एकून भूमिकेवर थेट भाष्य करत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. धडाकेबाज भाषण करत भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीडमध्ये झालेल्या राड्यावरून हे षडयंत्र कुणाच आहे ते उघड करण्याची मागणी केली आहे. यावेळी भुजबळांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) धरसोडीच्या राजकारणावर थेट हल्ला केला. अजितदादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
जयंत पाटलांना माघारी फिरवणारे पवारचं; भुजबळांनी अजितदादांसमोर सांगितलं चिडचिड होण्याचं कारण
पवारांना केला थेट सवाल
आम्ही सर्वजण भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर अनेक आरोप करण्यात आले. मात्र, त्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. यापूर्वीदेखील अनेकदा भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं तर चूक कसं काय? असा थेट सवाल भुजबळांनी पवारांना विचारला.
Chhagan Bhujbal : ‘आमची परीक्षा पाहू नका, जातगणना करा ताकदही कळेल’; भुजबळांचा थेट इशारा
पवारांनी भाजपसोबत अनेकदा युतीची चर्चा केली. पवारांच्या गटाची एवढी चिडचिड का चाललीये हे काही मला कळलं नाही. सगळेच इकडे आले तर आम्ही काय करायचं? तुमचंही तेच तर चाललं होतं. 2004 सालीही तुमचं तेच चाललं होतं. तेव्हापासून चालूच आहे ना? यातल्या काही गोष्टी प्रफुल्ल पटेलांना माहिती असल्याचे भुजबळ म्हणाले.
तळ्यात मळ्यात करण्यापेक्षा थेट निर्णय घेतला
मला फार थोड्या गोष्टी माहिती आहेत. पण जेव्हा माहिती झालं, तेव्हा वाटलं की तळ्यात-मळ्यात करण्याऐवजी एकदाचा काय तो निर्णय घ्या, अशा शब्दांत भुजबळांनी शरद पवारांचं नाव न घेता हल्लाबोल केला. आम्ही आमचा पक्ष सोडला नाही. नितिश कुमार, जयललिता, मेहबूबा मुफ्तींनी पक्ष बदलला, पण विचार बदलला का? अडीच वर्ष शिवसेनेसोबत होतो, पण विचारधारा बदलली का? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.