Download App

मोठी बातमी : हाकेंची प्रकृती चिंताजनक; रक्तदाब वाढल्याने ब्रेन हॅमरेजची डॉक्टरांनी व्यक्त केली भीती

ओबीसी आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाके यांच्या अमरण उपोषणाचा सातवा दिवस असून त्यांच्या जिवाला धोका असल्याचं डॉक्टर म्हणाले आहेत.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

वडीगोद्री  Jalna Laxman Hake Hunger Strike : ओबीसी आरक्षण बचावसाठी जालन्याच्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री या गावी उपोषण करत असलेले प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची तब्येत कमालीची खालावली आहे. (OBC reservation) त्यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनीही चिंता व्यक्त केली आहे. (Laxman Hake ) आता यावर सरकार काय भूमिका घेतय याकडे सर्वांचं लक्ष आहे.

तर आम्ही लगेच उपोषण सोडणार, लेटस्अप मराठीशी बोलताना लक्ष्मण हाकेंचा मोठा खुलासा

हाके यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे त्यांनी अन्न-पाण्याचा त्याग केला आहे. त्यामुळे तब्येत खालावली आहे. डॉक्टर दैनंदिन तपासणी करत आहेत. मात्र, आज सकाळी डॉक्टरांनी हाके यांची तपासणी केली असता हाकेंनी उपचार घेतले नाही तर त्यांना ब्रेनहॅमरेज होऊन जीविताला धोका देखील होऊ शकतो, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

हाके यांचे ब्लड प्रेशर १७८ पर्यंत पोहोचला असून वजन आठ किलो कमी झालं आहे. इतकं ब्लड प्रेशर वाढल्याने ब्रेनहॅमरेज होऊन हाके यांच्या जीवितला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं डॉक्टरांच मत आहे. दरम्यान, सरकारकडून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचंही हाके यांनी म्हटल आहे.

जरांगे मोठा लढा उभारण्याच्या तयारीत; म्हणाले, आरक्षण असताना ओबीसी; लढत असतील तर आम्ही

दुसरीकडे ओबीसी समाज आक्रमक झाला असून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये रास्ता रोको आंदोलन सुरू झालं आहे. सरकार ओबीसी आंदोलनाला सापत्न भावाची वागणूक देत असल्याची भावना ओबीसी समाजाकडून व्यक्त केली जात आहे. जालना जिल्ह्यासह विविध जिल्ह्यात ओबीसी वर्ग आता रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहे. त्यामुळे सरकार यावर काय तोडगा काढणार हा सर्वांना प्रश्न पडला आहे.

सरकार तुमचं आरक्षण गांभिर्याने घेत नाही का? असा प्रश्न मांडा असता सरकार विचार करत असेल कोण लक्ष्मण हाके. मी वंचित घटकाचे, मेंढपाळाचे मी प्रश्न मांडतोय. सहा-सात दिवसांपासून माझा लढा सुरू आहे. मात्र, सरकारने काही आणखी याची दखल घेतलेली नाही अशी खंतही हाके यांनी यावेळी उपस्थित केली. तसंच, वडिल गावी असून मुलीच्या शिक्षणसाठी पत्नी मुलगी पुण्याला असून माझ्या तब्येतीची त्यांना काळजी आहे असंही ते म्हणाले आहेत.

 

follow us

वेब स्टोरीज