Vijay Wadettiwar On Laxman Hake : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर जारी केला आहे. मात्र या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार असल्याची प्रतिक्रिया अनेक ओबीसी नेत्यांनी दिली. त्यामुळे सध्या आरक्षणावरुन राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील संपूर्ण राज्यात राज्य सरकारने जारी केलेल्या जीआर विरोधात सभा घेत जीआर रद्द करण्याची मागणी करत आहे. मात्र या सभांसाठी लक्ष्मण हाके पैशांची मागणी करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर आता या आरोपांवर काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत लक्ष्मण हाकेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा केला आहे.
माध्यमांशी बोलताना आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, लक्ष्मण हाके (Laxman Hake) ओबीसी चळवळीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करीत आहेत. सगळीकडे त्यांना लोक बोलवत आहेत. एखाद्या सभेसाठी जर पैसे मागितले असेल, तर या चुकीच काय आहे. त्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले आहे. लक्ष्मण हाके यांनी स्वतःहून पैसे मागितले नाही, यात चूक काय आहे. असं माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले.
तर दुसरीकडे त्यांनी मराठा आरक्षण जीआरवरुन राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत ओबीसींना फसवण्यासाठी गैरसमज त्यांनी करू नये असं म्हटले आहे. ओबीसींना फसवण्यासाठी गैरसमज चंद्रशेखर बावनकुळे यांनी करू नये, आमची चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती आहे. उद्याची पिढी यांना माफ करणार नाही, कारण हे सत्तेत आहेत. गैरसमज आमचा झाला नाही, तर तुमचा झालेला आहे. जीआर रद्द करण्यासाठी पुढे पाऊल टाका, ओबीसींची उद्याची पिढी उध्वस्त होईल. उध्वस्त पिढी जर झाली, तर जबाबदार तुम्ही असाल. असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.
भिकारी झालेलं सरकार आहे संपूर्ण महाराष्ट्राला या सरकारने लुटलेला आहे. अशा सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची आहे. ज्या सरकारने महाराष्ट्र लुटलेला आहे .कर्जबाजारी केलेला आहे. सत्तेमध्ये येण्यासाठी ज्या गोष्टी त्यांनी केला पाहिजे, नियम गुंडाळून कायदे गुंडाळून ते केलं आहे. महाराष्ट्र विकून त्यांना सत्तेत यायचं होतं ते आले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नाही.
प्रतिकात्मक अंत्ययात्रा अन् श्वानाच्या गळ्यात फोटो; गोपीचंद पडळकरांविरोधात कोल्हापुरात निषेध आंदोलन
सरकारची शेतकऱ्याबद्दल भूमिका हि दुप्पटी असल्याचे समजत आहे. 32 लाख हेक्टरच्या नुकसान अनेक भागांमध्ये झालेले आहे. अनेक पिकं खरिपाची हातातून गेली आहेत. त्यांना मदत करण्याची आवश्यकता होती. निवडणूक पूर्वी तीन हेक्टर पर्यंत मदत हवी होती. मात्र आता यांनी जीआर बदललेला आहे. उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.