Download App

हे तर शेतकरी विरोधी सरकार, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई : नवनिर्वचित राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांसदर्भात राज्यात सध्या अनेक प्रश्न उपस्थित असताना राज्यपाल रमेश बैस आपल्या अभिभाषणातून शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांना धीर देणार असल्याचं वाटलं, पण हे शेतकरीविरोधी सरकार असल्याचा घणागात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

अधिवेशनाच्या अद्याप सुरुवातही झाली नाही, त्याआधीच विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यासाठी कंबर कसली जात असल्याचं दिसून येतंय. अशातच काँग्रेसचे नाना पटोलेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिवेशनात कोणते मुद्दे मांडणार आहे, याबाबत भाष्य केलंय.

अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळल्या

नाना पटोले म्हणाले, मला वाटलं होतं हे सरकार शेतकऱ्यांनी धीर देईल पण हे शेतकरीविरोधी सरकार असल्याचा प्रत्यय पहिल्याच दिवशी आम्हाला आला आहे. राज्यात कांदा, कापूस, सोयाबीन, धान उत्पादक शेतकऱ्यांची बिकट अवस्था असून शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी बरबाद होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

हिंदुत्वाचे सोंग आणि ढोंग म्हणायचं ते यालाच…

एकीकडे राज्यातला शेतकरी अडचणीत आहे आणि दुसरीकडे हे राज्य सरकार राज्यपालांच्या हस्ते आपली पाठ थोपटवून घेत आहे. अधिवेशनात आम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडणार असून सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार असल्याचा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.

शिंदे महाराष्ट्राचे की गुजरातचे मुख्यमंत्री? आदित्य ठाकरेंनी भर सभेत ललकारलं

नूकतंच पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक पार पडली. या निवडणूकीत दिवसाढवळ्या पोलिसांच्या साक्षीने पैसे वाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भातील कारवाईसाठी आम्ही पोलिस आयुक्तांना पत्र देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

तसेच सत्ताधाऱ्याकंडून कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचारात तडीपार लोकांना उभे करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता, जनतेला भीती दाखवून मते मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

Tags

follow us