हिंदुत्वाचे सोंग आणि ढोंग म्हणायचं ते यालाच…
कोल्हापुरातील कणेरी मठातल्या 52 गाईंचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला तर आणखी पन्नासेक गाई गंभीर आहेत. कणेरी मठात पंचमहाभूत सुमंगलम लोकोत्सव सुरू असून लोकोत्सवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री येऊन गेले. त्यानंतर गाईंचा मृत्यू विषबाधेने झाल्याचं उघड झालंय. त्यावरुन आता ठाकरे गटाच्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून गाईंना श्रद्धांजली वाहत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधून टीका करण्यात आलीय.
अग्रलेखात म्हटलं, “कणेरी मठास घटनाबाह्य सरकारचे पाय लागतात काय व विषबाधेचे निमित्त ठरून पन्नासांवर गाईंचा मृत्यू होतो काय, हे सगळेच अनाकलनीय आहे. कणेरी मठातील गाईंचे सामुदायिक आत्मार्पण हा चिंतेचा विषय आहे. एका गाईसाठी दंगली उसळतात, घडवल्या जातात, पण 52 गाईंच्या संशयास्पद मृत्यूनंतरही ‘रेडा’प्रेमी सरकार अश्रू ढाळायला तयार नाही. हिंदुत्वाचे सोंग आणि ढोंग म्हणायचे ते यालाच. कोल्हापुरातील 52 गोमातांना आम्ही श्रद्धांजली वाहत असल्याचं म्हटलयं.
अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारला घेरणार, एकनाथ खडसेंनी थोपटले दंड
महाराष्ट्रावर सध्या संकटाचे काळेकुट्ट ढग स्पष्टपणे दिसत आहेत. राज्यातले सरकार हे ‘जादूटोणा’ सरकार असल्याची चेष्टा जनमानसात सुरू आहे. जादूटोण्यास महाराष्ट्रात कायद्याने प्रतिबंध आहे. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात ही असली थेरं अजिबात चालणार नाहीत, पण हे आपल्या राज्यकर्त्यांना कोणी सांगायचे? आत्मबलाचा अभाव असला की, अशा गोष्टींचा आधार घेतला जातो.
अर्थसंकल्पीय अधिवेशन! सत्ताधारी-विरोधक भिडणार
गुवाहाटीतील रेडाबळीपासून महाराष्ट्रात इतर ‘बळी प्रयोग’ करून राजकीय यशाचा मार्ग शोधणारे सध्याचे सरकार आहे. म्हणूनच कणेरी मठातील 52 गाईंचा मृत्यू हे प्रकरण सखोल चौकशी व्हावी असे आहे. पालघरातील साधुकांड हे जर हिंदुत्वाचे हत्याकांड ठरवले जात असेल तर कोल्हापुरातील 52 गोमातांचा मृत्यूसुद्धा हिंदुत्वाला वगैरे धक्कादायक मानावा लागेल. कारण गाईंचे मृत्यू नैसर्गिक नसून विषबाधेमुळे झाल्याचे उघड झाले आहे.
Eknath Shinde होय मी साक्षीदार आहे… फडणवीस, महाजनांना अटक करण्याच्या कटाचा!
कोणाच्या तरी अज्ञानातून विषबाधेचे प्रकरण घडले असे मठाचे अधिपती काडसिद्धेश्वर स्वामी सांगतात. मठात असंख्य गाई आहेत व गाईंचे पालनपोषण तेथे केले जाते. आतापर्यंत गाईंचा अशा प्रकारे सामुदायिक मृत्यू झाल्याची घटना कधी घडल्याचे स्मरत नाही. मग राज्यात ‘पाप’मार्गाने सरकार आले व त्या पापी सरकारचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मठातील गोशाळेत जाऊन आल्यावरच गाईंनी प्राण सोडावा या दुर्दैवास काय म्हणावे? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, ज्या गोव्यात ‘गोमांस’ खुल्या बाजारात सरकारी कृपेने मिळते, त्या राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोल्हापूरच्या कणेरी मठात येऊन गाईंना चारा घालतात, गाईंचे आशीर्वाद घेतात हे ढोंग नाही तर काय? वीर सावरकर यांनी गाईस गोमाता म्हणण्यास नकार दिला.
गाय हा एक उपयुक्त पशू आहे, असे ते म्हणत. वीर सावरकरांचा हा विज्ञानवादी दृष्टिकोन सध्याच्या उथळ आणि बेताल हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे काय? कणेरी मठातील गाईंचे सामुदायिक आत्मार्पण हा चिंतेचा विषय आहे.