अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारला घेरणार, एकनाथ खडसेंनी थोपटले दंड

अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारला घेरणार, एकनाथ खडसेंनी थोपटले दंड

जळगाव : राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी सकारात्मक उत्तर दिलं पाहिजे, ते सोडून टीका-टिप्पण्णी करत असल्याचा मिश्कील टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी लगावला आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आजपासून होणाऱ्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारला घेरणार असल्याचा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या कापसाला, कांद्याला, सोयाबीनला भाव मिळत नाही.

गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओची राज्य महिला आयोगानेही घेतली दखल

जिल्ह्यात वाळुमाफियांची मुजोरी वाढलीय, पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही काही उपयोग होत नाही. याउलट हप्ते वाढवून घेत सर्रासपणे हे धंदे सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Sanjay Raut : कंगना, ही कोण शहाणी ? ती तर.. राऊतांनी कंगनाला फटकारले

तसेच राज्य सरकारवर 6 लाख 66 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. कर्ज घेताना मागील सात महिन्यातच मोठ्या प्रमाणात कर्ज घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. कर्ज घेऊन मोठ-मोठ्या शहरांकडे राज्य सरकारचं अधिक लक्ष आहे, ग्रामीण भागाकडे त्यांचं दुर्लक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

आमच्याबरोबर निवडून आले आणि आमच्यापासून पळून गेले, राम शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीनवेळा जळगावात येऊन गेले आहेत. त्यांनी नुसताच घोषणांचा पाऊस पाडला आहे. प्रत्यक्षात काम मात्र काहीचं केलं नसल्याची टीका त्यांनी केलीय.

कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा, आज 32 वा दिवस

कसबा चिंचवड पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी पूर्वीपेक्षा कमी आहे. या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube