आमच्याबरोबर निवडून आले आणि आमच्यापासून पळून गेले, राम शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल

आमच्याबरोबर निवडून आले आणि आमच्यापासून पळून गेले, राम शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल

अहमदनगर : भाजप निवडणुकीला घाबरत आहे म्हणून ते निवडणुकांपासून पळ काढत आहेत अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली होती. यावर भाष्य करताना भाजप आमदार राम शिंदे यांनी दानवेंवर टीका केली आहे. जे आमच्याबरोबर निवडून आले आणि आमच्यापासून पळून गेले, त्या पक्षाचे विरोधी पक्ष नेते असं वक्तव्य करतात अशा शब्दात शिंदे यांनी अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजप आमदार राम शिंदे हे नगरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या एका वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी मोदींची प्रशंसा करत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी निवडणुकीला घाबरत नाही, नरेंद्र मोदी यांच्यासारखे पंतप्रधान हे देशाला लाभले आहे, त्यांच्यामुळे देशाचं जगात नाव गाजत आहे. ठाकरे गटावर निशाणा साधताना शिंदे म्हणाले, जे आमच्याबरोबर निवडून आले आणि आमच्यापासून पळून गेले, त्या पक्षाचे विरोधी पक्ष नेते असं वक्तव्य करतात. आता जेव्हा केव्हा मैदान सुरू होईल त्यावेळेस कोण निवडणुकीला घाबरतात हे आपल्याला भविष्यात दिसेल असं राम शिंदे म्हणाले.

प्रकाश आंबेडकर म्हणजे बुचकळ्यात पडलेलं व्यक्तिमत्व

आमदार शिंदे यांनी आजच्या पोटनिवडणुकीमधील विरोधकांच्या आरोपावर देखील भाष्य केले. कसबा विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटले जात असल्याच्या आरोपावर बोलताना राम शिंदे म्हणाले की, प्रचार संपलेला आहे. प्रचार संपल्यानंतर अशा पद्धतीने स्टंटबाजी केली जात आहे. बिन बुडाचे आरोप केले जात आहे आणि लोकांचं मन, मत विचलित करण्याचा प्रयत्न काँग्रेस उमेदवार करत असल्याचे प्रतिपादन शिंदे यांनी केलं.

कसब्यात राडा, भाजपच्या बीडकरांकडून काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण

मोदींच्या नेतृत्वामुळे विरोधक भयभीत
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. यावर देखील शिंदे यांनी भाष्य केले. शिंदे म्हणाले, मोदींच्या नेतृत्वामुळे भयभीत झालेले, अडचणीत आलेले सगळे एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. 2019 ला देखील तसा प्रयत्न झाला. आता भविष्यात देखील तशा पद्धतीचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. पण याचा भाजपला काहीही फरक पडणार नाही. हा त्यांचा केवळ मीडियाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे असं राम शिंदे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube