गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओची राज्य महिला आयोगानेही घेतली दखल
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात सध्या नृत्यांगणा गौतमी पाटीलचं (Gautami Patil) नाव चर्चेत आहे. तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जात असला तरी तिची आणि तिच्या नृत्याची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. अशातच गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ चोरून चित्रित करून व्हायरल केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलताना व्हिडिओ (Gautami Patil Video) चित्रित व्हायरल करण्यात आल्यानं सोशल मीडियावर सकाळपासून संतापाची लाट उसळली आहे. अखेर या प्रकरणी राज्य महिला आयोगालादेखील (State Commissions for Women) दखल घ्यावी लागली आहे. महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरता कृती कार्यक्रम जाहीर करा, असा आदेश राज्य महिला आयोगाने सायबर विभाग आणि पोलीस महानिरीक्षकांना दिलेला आहे.
गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा अर्धनग्न व्हिडिओ व्हायरल करण्यात आला असून, अज्ञाताने तिच्या नावाने बनावट खाते काढून हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. कायमच चर्चेत असणाऱ्या गौतमी पाटीलची बदनामी करण्यासाठी हा खोडासळपणा केल्याची शक्यता आहे. पोलिसांनी याप्रकरणी आता गुन्हा नोंद केला आहे. तर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटवरवर याबाबतची माहिती दिली आहे. महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे, अशी माहिती रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली.
महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे. १/३ @MahaCyber1 @DGPMaharashtra
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 26, 2023
चाकणकर यांनी लिहिलं की, लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. २/३
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 26, 2023
एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील.
३/३— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 26, 2023
दरम्यान, गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातील काहीजण गौतमी पाटील हिच्या नृत्याला विरोध असला तरी अशा प्रकारे बदनामीच्या हेतूने व्हिडीओ व्हायरल करणे चुकीचे असल्याचे म्हणत आहेत.
Bharat Gogawale शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या आमदारांना ‘व्हिप’… कारवाई दोन आठवड्यानंतर करण्याचा इशारा!