शेतकऱ्यांची क्रूर थट्टा! 512 किलो कांदा विकून मिळाला 2 रुपयाचा चेक, अजित पवारांनी काढले सरकारचे वाभाडे
मुंबई : राज्यभरात कांद्याच्या दरात (price of onions) घसरण होत आहे. सोलापुरात देखील त्याचा फटका एका शेतकऱ्याला बसला. सोलापूर आणि उस्मानाबादच्या सीमेवर दिवसरात्र राबराब राबून मोठ्या कष्टाने पिकवलेल्या 512 किलो कांदे विकणाऱ्या कांदा उत्पादकाला अडत व्यापाऱ्याने दोन रुपयांचा धनादेश (A check for two rupees) दिला होता. या धनादेशाची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील याची दखल घेतली. सोलापुरातील एका 512 किलो कांदा विकल्यानंतर या शेतकऱ्याला 2 रूपयांचा चेक मिळाला. हे दुर्दैव आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही शोकांतिका आहे, असं सांगत अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. अधिवेशनच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेतली. त्या परिषदेत अजित पवारांनी कांदा उत्पादकांची व्यथा मांडली. यावेळी अजित पवार म्हणाले की, आमच्याशी एका शेतकऱ्याने संपर्क साधला, सोलापुरातील शेतकरी राजेंद्र चव्हाण (Farmer Rajendra Chavan) यांनी सोलापूर मार्केट यार्डात 17 फेब्रुवारीला, 512 किलो कांदा विकला. किलोला 1 रुपया दर देण्यात आला. त्यानंतर ट्रान्सपोर्ट, हमाली, तोलाईचा खर्च वजा करुन या शेतकऱ्याला २ रूपयांचा चेक मिळाला. तो देखील 3 आठवड्यानंतर दिला आहे. तर नायगावच्या शेतकऱ्याने 4 क्विंटल कांदा विकला आणि त्याला विक्री करून वरती 350 रुपये गाडी भाडे द्यावे लागले. हे दुर्दैव आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही शोकांतिका आहे, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, राज्यकर्ते कोणीही असो,अशी वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये. कांदा उत्पादकांना न्यायदेण्यासाठी कांद्यांची निर्यात केली पाहिजे, त्यानंतर लगेचच काद्याचे भाव वाढतील. बांगलादेशमध्ये प्रचंड कांद्याची मागणी आहे. ज्याप्रकारे साखर उत्पादकाला न्याय देण्यासाठी साखरेची निर्यात केली. त्या पार्श्वभूमीवर काद्यांचीही निर्यात करण्याचा निर्णय घ्यावा, असंही अजित पवार म्हणाले.
यावेळी बोलतांना पवार म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. मात्र, आम्ही एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या नॉर्मच्यापेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकची रक्कम दिल्याचे वारंवार सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने सांगण्यात येते. परंतु, आम्ही ज्यावेळी महाराष्ट्रातील विविध भागांत फिरलो, त्यावेळी जाहीर केलेली मदत अद्याप सर्वत्र पोहोचलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतीमालाला किंमत नाही, असं निदर्शनास आले.
Kasba Bypoll मतदार यादीत मयतांची नावे… जिवंत व्यक्तिंची नावे गायब!
नेमका काय म्हटलं राजेंद्र चव्हाणांनी?
याचवेळी अजित पवारांनी संबंधित शेतकऱ्याचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. यात कांदा उत्पादक शेतकरी रवींद्र चव्हाण यांनी या महाराष्ट्रातला शेतकरी कसा जगायचा नि कसा वाचायचा, आता जीव सोडून द्यावा की काय करावं, अशी भ्रांत आम्हाला पडल्याची भावना व्यक्त केली आहे.
शेतकऱ्याने सांगितलं की, मला व्यापाऱ्यानं चेकही पंधरा दिवसांनंतरचा दिला आहे. आमचे वीज कनेक्शनही तोडायला लोक यायला लागते. त्याचं बील थकलयं. डीडीसी बॅंकेचं सहा-साडेसहा लाखांचं कर्ज थकलं आहे. या सर्वांत आम्ही जगायतं तरी कसं ? ही भ्रांत आम्हाला पडली आहे. आता जीव सोडून द्यावा, जगल्यापेक्षा मेलेलं बरं, असं आम्हाला वाटू लागलं आहे. आता याला तुम्हीच न्याय करावा, अशी आमची तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे, अशी व्यथा शेतकऱ्याने मांडली आहे.