Download App

अवकाळ्याचा पुन्हा एकदा तडाखा, पिके जमीनदोस्त, शेतकरी चिंताग्रस्त

  • Written By: Last Updated:

unseasonal rain राज्यात पुन्हा एकदा काल पासून अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. काल आणि आज राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस बरसला, विजांच्या कडकडा आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या या पाऊसामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली आहे. ठीक ठिकाणी पाउसासह गारदेखील पडल्या. या अवकाळीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाले आहे. मागच्याच महिन्यात अवकाळी पाऊसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. आता त्यामध्ये अजून भर पडली आहे. त्यामुळे शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाले आहेत.

या अवकाळी पाऊसाचा सर्वाधिक फटका अहमदनगर जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यातील राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने गहू, उन्हाळी बाजरी, चारापिके, कांदा, द्राक्ष, टरबूज, खरबूज, आंबा, फळे भाज्या, पालेभाज्या या पिकांचा समावेश आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे फळबागाला सर्वाधिक फटका बसला आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Kolhapur Breaking : मुलाला डॉक्टर बनवता येईना! शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल… 

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला या अवकाळी पाऊसाचा सर्वाधिक फटका बसला जिल्ह्यातील सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, वाई भागाला पाऊसच सर्वाधिक फटका बसला आहे. यामध्ये स्ट्रॉबेरी आणि आंबा पिकाचे सर्वाधिक फटका बसला आहे. अचानक आलेल्या पाऊसामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचीच तारांबळ उडाली बाजारामध्ये लोकांची पळापळ झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पाऊस बरसणार आहे.

Tags

follow us