ऑनलाईन MPSC परीक्षेला स्थगिती; CM फडणवीसांचे राज्य लोकसेवा आयोगाला आदेश

MPSC Online Exam : या वर्षापासून एमपीएसीची परीक्षा ऑनलाईन घेण्यात येण्याचा निर्णय राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला होता मात्र या निर्णयाला

MPSC Online Exam

MPSC Online Exam

MPSC Online Exam : या वर्षापासून एमपीएसीची परीक्षा ऑनलाईन घेण्यात येण्याचा निर्णय राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला होता मात्र या निर्णयाला विद्यार्थ्यांकडून होणारा विरोध पाहता पुढील एका वर्षासाठी हा निर्णय स्थगित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य लोकसेवा आयोगाला दिले आहे.

राज्य लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर ऑनलाईन परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेत या निर्णयाला पुढील वर्षासाठी स्थगिती देण्याचे आदेश दिले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एक सुरक्षित, पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमचा माझा आग्रह राहिला आहे. त्याद्दष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे आणि त्याचे निकाल सुद्धा वेळेत लागले पाहिजेत. सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसऱ्या व्यवस्थेकडे मार्गेात्क्रमण हे तितकेच सुरळीत सुद्धा असले पाहिजे. त्यातून प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी सुद्धा मिळावा त्यामुळे टप्प्या-टप्प्याने या सुधारणाराबवत संगणकआधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करत ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी जेणेकरुन विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी जीवन संपवलं; व्हिडिओ बनवला अन् घेतलं माजी आमदार रविद्र धंगेकरांचं नाव

तर दुसरीकडे एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी एमपीएससी कार्यालयासमोर मागील नऊ दिवसांपासून सुरू असलेले काँग्रेसचे बेमुदत साखळी उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. मुख्यमंत्रीांनी एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षेला स्थगिती दिल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि पेढे वाटून निर्णयाचे स्वागत करत विजय साजरा केला. ऑनलाईन परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करूनच पुढील निर्णय घ्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आबा दळवी यांनी केली.

Exit mobile version