Download App

Muslim Reservation: ‘मुस्लिम आरक्षण संपवणे हे आमचे लक्ष्य’: अमित शाहंचे मोठे विधान

Amit Shah on Muslim Reservation :

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी नांदेडमध्ये मुस्लिम आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भाजपचा (BJP) मुस्लीम आरक्षणाला विरोध आहे कारण हे आरक्षण संविधान विरोधात आहे. धर्माच्या आधारावर कोणतेही आरक्षण संविधानाला अपेक्षित नाही, असे म्हणतं मुस्लीम आरक्षण संपविणे हे आमचे लक्ष्य असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच यावर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपली भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान देखील अमित शहा यांनी दिले आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे की, “मी उद्धव ठाकरेंना विचारतो की कर्नाटकात स्थापन झालेल्या सरकारला इतिहासाच्या पुस्तकातून वीर सावरकर मिटवायचे आहेत. तुम्ही याच्याशी सहमत आहात का?” मी नांदेडच्या जनतेला विचारतो की महान देशभक्त, त्याग पुरूष वीर सावरकर यांचा सन्मान करायचा की नाही? उद्धवजी, तुम्ही दोन बोटीत पाय ठेवू शकत नाही… उद्धवजी म्हणतात की आम्ही त्यांचे सरकार पाडले. त्यांचे सरकार आम्ही पाडले नाही. तुमच्या दुटप्पी भूमिकेला कंटाळून शिवसैनिकांनी तुमचा पक्ष सोडला आहे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्र्यांचं प्रमोशन होणार? अमित शाहंकडून नांदेडमधील सभेत फडणवीसांचा खास ‘सन्मान’

केंद्रातील मोदी सरकारच्या 9 वर्षे पूर्तीनिमित्त नांदेड इथे भाजपची महाजनसंपर्क अभियानांतर्गत सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गृहमंत्री अमित शहा या सभेचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण दरेकर तसेच प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते. यावेळी अमित शहांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली.

अजितदादा, जयंत पाटलांना बाजूला ठेवत पवारांनी उभारली नवी टीम; कोणाकडे कोणती जबाबदारी?

ते म्हणाले की “पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे तिथे ‘मोदी… मोदी… मोदी’च्या घोषणा दिल्या जातात… एकीकडे मोदीजींना जगात मान मिळत आहे. दुसरीकडे काँग्रेसचे राजपुत्र राहुल बाबा परदेशात जाऊन देशाचा अपमान करत आहेत. राहुल गांधी इथे बोलत नाहीत, परदेशात बोलतात कारण त्यांना ऐकणारे इथे कमी झाले आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली.

Tags

follow us