उपमुख्यमंत्र्यांचं प्रमोशन होणार? अमित शाहंकडून नांदेडमधील सभेत फडणवीसांचा खास ‘सन्मान’
Amit Shah criticizes on Congress-NCP :
नांदेड : राज्यातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे डिमोशन झाले असल्याचे, फौजदाराचा हवालदार झाला असल्याच्या टीका अनेकदा होतात. केंद्रातील नेतृत्वाची नाराजी असल्यानेच फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्विकारायला लावले, असे बोलले गेले होते. मात्र आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (10 जून) नांदेड येथील सभेत फडणवीस यांच्या केलेल्या खास सन्माने त्यांचे पुन्हा प्रमोशन होणार का? केंद्रीय नेतृत्वाची कथित नाराजी दूर झाली का? असे सवाल विचारले जात आहेत.
नेमकं काय झालं सभेत?
केंद्रातील मोदी सरकारच्या 9 वर्षे पूर्तीनिमित्त नांदेड इथे भाजपची महाजनसंपर्क अभियानांतर्गत सभा आयोजित करण्यात आली होती. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या सभेसाठी पुढाकार घेतला होता. तर अमित शहा या सभेचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी भाषणाला उभे राहताच अमित शाह यांनी दिग्गज नेता म्हणतं फडणवीस यांचे सर्वात पहिले नाव घेतले. तसंच त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळातील कामाचे कौतुकही केले. त्यानंतर दुसऱ्या नंबरला त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव घेतले. वास्तविक पक्षाचा कार्यक्रम असल्याने बावनकुळे यांचे नाव पहिल्यांदा घेणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता अमित शाह यांनी फडणवीस यांना खास सन्मान देत महाराष्ट्रात भाजपवर अद्यापही त्यांचाच शब्द अंतिम असल्याचा सूचक इशारा दिला.
काय म्हणाले अमित शाह?
लोकसभेच्या 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने नरेंद्र मोदींना भरभरुन मतदान दिले. मोठ्या संख्येने खासदार निवडून दिले. मोदी सरकारचा नऊ वर्षाचा काळ भारत देशाचा उत्कर्षाचा काळ होता, गरिबांच्या कल्याणाचे होते, देशाला सुरक्षित करण्याचे होते. काँग्रेसचे सरकार गेल्यानंतर मोदी सरकार आले सर्व क्षेत्रात मोठा विकास झाला. काँग्रेसच्या मागील 10 वर्षाच्या काळात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला. 12 लाख कोटींचे घोटाळे काँग्रेसच्या सरकारच्या काळात झाले असा हल्लाबोल करत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विरोध एकही भ्रष्टाचाराचा आरोप लावू शकले नाहीत. आम्ही पारदर्शक कारभार केला आहे, असा दावा शाह यांनी केला.
भाजपला धक्का द्यायचाय, पवारांनी सांगितला 77 चा किस्सा; विरोधकांना दिलं ‘टॉनिक’
राहुल गांधींच्या 4 पिढ्यांनी देशावर राज्य केले पण देशातील जनतेला शौचालय, घर, गॅस, मोफत अन्नधान्य देऊ शकले नाहीत. मग तुम्ही गरीब लोकांसाठी काय केलं? देशाच्या स्वातंत्र्यानंतर फक्त नरेंद्र मोदींनी गरीबांचे कल्याण केले आहे, असा सवाल करत शाह यांनी मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले.
शाह म्हणाले, देशाच्या संविधान निर्मितीच्यावेळी 370 कलम तात्पुरते लागू केले होते. पण हे कलम हटवण्याची कोणाची हिम्मत नव्हती. मतदानाच्या लालचेसाठी कोणत्याही विरोधकांनी हे कलम हटवले नाही. पण नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर एका झटक्यात हे कलम हटवून जम्मू-काश्मिरला भारताचे कायमचे भाग बनवले. त्यावेळी सगळ्या विरोधाकांनी विरोध केला होता. रक्ताचे पाट वाहतील असे म्हणायचे पण एक दगड देखील कोणी कोणाला मारला नाही, असे अमित शहा यांनी म्हटले.
अजितदादा, जयंत पाटलांना बाजूला ठेवत पवारांनी उभारली नवी टीम; कोणाकडे कोणती जबाबदारी?
शाह पुढं म्हणाले की मोदी मागील नऊ वर्षात देशात सुरक्षित केले. मागील दहा वर्षात पाकिस्तानातून कोणतेही दहशतवादी देशात घुसत होते. बॉम्बस्फोट करत होते. आतंकवादी देशात येऊन आपल्या जवानांचे डोके कापून घेऊन जात होते. पण मनमोहन सिंग यांच्या तोंडातून एक शब्द निघत नव्हता. मोदी आल्यानंतर दहशतवाद्यांनी उरी आणि पुलवामा हल्ला केला होता पण दहा दिवसांत सर्जिकल आणि एअर स्ट्राईक केला. पाकिस्तानात घुसून दशहतवाद्यांचा नायनाट करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले, असा हल्लाबोल अमित शहा यांनी केला.