“मी मुख्यमंत्री म्हणून जे करायचं ते केलं, पण ज्या पद्धतीने पाठीत वार करून ज्या पद्धतीने सरकार पाडले, त्याचा सूड आणि बदला घेणार” असं वक्तव्य शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज केलं आहे. भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी कामगारांच्या प्रश्नांवर भाष्य करतच सरकारवर देखील टीका केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना अडीच वर्षात 25 मोठे उद्योग आणि अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आपण आणत होतो. पण सरकार बदल्यावर त्यातील बरेचसे यांनी डोळ्यादेखत पळवुन नेले, ओरबाडुन नेले, तरी शेपट्या घालुन आत बसणारे बाळासाहेबांचे विचार दाखवत आहेत? हे बाळासाहेबांचे विचार? भूमिपुत्रावर अन्याय करणारे बाळासाहेबांचा विचार कसा सांगत आहेत, असा प्रश्न त्यांनी शिंदे गटाला विचारला.
मुख्यमंत्री साताऱ्यातही ऑनड्युटी; एकाच दिवसांत केला 65 फाईल्सचा निपटारा
राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले की सध्याचे निरुद्योगी मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तैवानच्या कंपनीसोबत एमओयु केला होता, 2300 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार म्हणून फोटो काढले, ती जोडे बनवणारी कंपनी देखील तामिळनाडूत गेली, हे बसलेत जोडे पुसत! फक्त जोडे पुसण्याची लायकी असलेली लोक राज्य करत आहेत, महाराष्ट्राच होणार काय? अशी टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, “मी मुख्यमंत्री म्हणून जे करायचं ते केलं, पण ज्या पद्धतीने पाठीत वार करून ज्या पद्धतीने सरकार पाडले, त्याचा सूड आणि बदला घेणार.”
नव्या कामगार कायद्यावरून टीका करताना ते म्हणाले की, कामगारांना किती प्रकारे छळणार? मशीन वेगळी आणि ती देखील बिघडते. जीतीजागती माणसं, त्यांचा माणूस म्हणून तुम्हीं कधी विचार करणार की नाही? की नुसतच कामगार म्हणून वाट्टेल तस त्यांना वापरणार?
Amol Kolhe : ‘हिंदुत्वा’च्या बाबतीतील राज ठाकरे यांची भूमिका मला पटली
ते पुढे म्हणाले की अरविंद, (अरविंद सावंत) तिकडे सत्तेत असताना हा कायदा रोखला होता, मी मुख्यमंत्री असताना हा काळा कायदा रोखला होता, आम्हीं दोघही सत्तेतुन बाहेर गेल्यावर हा काळा कायदा आणला, मग नुकसान कुणाच झालं? माझ झालं? अरविंदच झालं? की राज्याच झालं? कामगारांच झालं?
अरविंदच सुद्धा कौतुक एवढ्यासाठी करायला हवं की जस मी एका क्षणात वर्षा सोडुन दिलं, मुख्यमंत्री पद सोडुन दिलं आणि ज्या वेळेस माझ्या लक्षात आलं हे भाजप वाले गडबड करत आहेत, मी अरविंदला फोन करुन सांगितल, ‘अरविंद राजीनामा द्या’, ‘येस सर’! का? माझ काय चुकलं? काय करू? अस नाही… फोन ठेवला, राजीनामा देऊन आला. ही अशी माणसं, शिवसेनाप्रमुखांनी घडवलेली माणसं! असं म्हणत ठाकरे यांनी अरविंद सावंत यांचं कौतुक केलं.