हाकेंनी संयम ठेवलाय त्यांना गांभीर्याने घ्या; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहित पंकजा मुंडे मैदानात

Pankaja Munde यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्मण हाके यांच्या मागणीचा सरकारने गांभीर्याने विचार करावा असे आवाहन केलं

Pankaja Munde हाकेंनी संयम ठेवलाय यांची मागणी गांभीर्याने घ्या; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहित पंकजा मुंडे मैदानात

Pankaja Munde

Pankaja Munde wrote letter to CM and DCM for Lakshman Hake : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना (CM and DCM) पत्राच्या माध्यमातून लक्ष्मण हाके ( Lakshman Hake) यांच्या मागणीचा सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि मंत्री तथा स्वतः तिथे जाऊन हाके यांच्या आंदोलनाचा योग्य तो सन्मान करावा, असे आवाहन केलं आहे.

… तर चित्र वेगळे असते, मोदी आणि शाहंकडे मी येतो; उमेदवार बदलल्याने रामदास कदम संतापले

राज्यात गेल्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा आरक्षणाबाबत आधी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं होतं. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणासाठी आणि मराठा आरक्षणाविरोधात उपोषणाचे हत्यार उपसले. त्यावर पंकजा मुंडे यांनी त्यांची भेट घेत तब्बेतीची विचारपूस केल्यानंतर आता त्यांनी हाकेंसाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहित पंकजा मुंडे मैदानात उतरल्या आहेत.

पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आवाहन…

या पत्रामध्ये पंकडा मुंडे म्हणाल्या आहेत की, ओबीसी आरक्षणा संदर्भात प्रा. लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी वडीगोद्री जि. जालना येथे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नाही पाणी देखील बंद केले आहे. शासनाची भूमिका ही सर्व आंदोलनांना सारखीच असली पाहिजे. हाके यांच्याबाबत प्रमुख मंत्र्यानी तसेच आपण स्वतः गांभिर्याने लक्ष तर द्यावेच याशिवाय उपोषणास भेट देऊन सन्मान द्यावा, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं.

उद्धव ठाकरेंनी मोदींचा खुळखुळा केला, मोदी ब्रॅंड नाही, ब्रॅंडी झालेत…; राऊतांचे टीकास्त्र

ते अत्यंत संयमाने आणि सर्वांना सन्मानाने वागवत आहेत. हे कौतुकास्पद आहे. त्यांचं आणि सर्व ओबीसी नेत्यांचं आवाहन देखील सकारात्मकच आहे. “कोणीही कुठल्याही प्रकारे नकारात्मक गोष्टी करू नयेत, कुठल्याही प्रकारची हिंसा करू नये असंच आवाहन ते करत आहेत म्हणजे व्यवस्थेचा सन्मानच करत आहेत. म्हणूनच त्यांच्याकडे तात्काळ लक्ष देणं तेवढंच महत्वाचं आहे. इथे प्रश्न समान न्यायाचा आहे, म्हणणे ऐकून कायद्याने निर्णय घ्यावा अशी आवश्यकता आहे. आपण व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीने या आंदोलना विषयीची आपली भूमिका जाहीर स्पष्ट करावी व तिथे भेट द्यावी अशी आपणास माझी विनंती आहे.

Exit mobile version