Download App

Pankaja Munde कुठून निवडणूक लढवणार? म्हणाल्या माझा निर्णय झाला…

  • Written By: Last Updated:

Pankaja Munde : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रेची चर्चा सध्या राज्यात होत आहे. नुकतेच ही यात्रा बीडमध्ये आली होती. यावेळी त्यांनी भाषणामध्ये अप्रत्यक्षपणे अनेकांना टोले लगावले. तसेच या यात्रे नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना आता भाजप राष्ट्रवादी एकत्र आल्याने आगामी निवडणूक पंकजा कुठून लढणार असा प्रश्न विचारण्यात आला यावेळी त्यांनी उत्तर दिले. त्या काय म्हणाल्या पाहूयात…

राष्ट्रीय तपास संस्थेत विविध पदांची भरती, महिन्याला 2,15, 900 रुपये पगार, ‘या’ तारखेपूर्वीच करा अर्ज

पंकजा मुंडे कुठून निवडणूक लढवणार?

भाजप राष्ट्रवादी एकत्र आल्याने आगामी निवडणूक पंकजा कुठून लढणार असा प्रश्न विचारण्यात आला यावेळी त्यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, मी माझं भाषण स्पष्ट आणि व्यवस्थित केलं आहे. की, कोणालाही उचलून त्याच्या जागेवर मी बसणार नाही. ती माझी बहिण जरी असली तरी मी तिच्या जागेवर निवडणूक लढणार नाही. ती 10 वर्ष खासदार राहिली आहे. तीला घरी बसवून मी तिची जागी घेऊ शकत नाही. तसेच कोणत्याही पक्षाशी आणि माझ्या पक्षाशी देखील तशी चर्चा झालेली नाही. पण माझा निर्णय झालेला आहे. मी जगात कुठे ही निवडणूक लढवेन पण प्रितमच्या जागेवर निवडणूक लढणार नाही. असं यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

मिठी मारणाऱ्याचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो; आव्हाडांचं मुंडेंना प्रत्युत्तर

तसेच या परिक्रमेत बोलताना त्या म्हणाल्या की, मला एवढ्या वेळा नाकारलं गेलं, एवढ्या वेळा अडचणी आणल्या गेल्या, परंतु मी अढळ राहिले, असल्याची खंत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे(BJP Leader Pankja Munde) यांनी बोलून दाखवली आहे. तसेच माझ्याकडे जे काम दिलंय ते मी करत असते. मध्य प्रदेशची जबाबदारी दिली ती मी पार पाडते आहे. या गोंधळातून बाजूला होवून विचार केला पाहिजे, म्हणून मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेक घेते असं सांगणं सोपं नसतं. कोण कसा आहे ते जनतेला चांगलं माहिती असतं. गढूळ वातावरणात तुरटीचं काम करण्याची माझी इच्छा असल्याचं मुंडे म्हणाल्या आहेत.

Tags

follow us