Download App

Paris Olympic : कांस्य जिंकल्यानंतर 1 कोटींची मदत अन् प्रमोशन पण स्पर्धेपूर्वी स्वप्नीलची कुचंबणा

आवश्यक कागदपत्रे जोडूनही ऑलिम्पिकवीर स्वप्निल कुसळेला राज्य सरकाकडून एकही रुपया मिळाला नसल्याची खंत मार्गदर्शक अक्षय अष्टपुत्रे यांनी व्यक्त केलीयं.

Swapnil Kusale : आम्ही आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे देऊनही आम्हाला एकही रुपया मिळाला नाही, जर स्वप्नीलला सरकारी मदत वेळेवर मिळाली असती तर आज चित्र वेगळं असतं, अशी खंत ऑलिम्पिकवीर (Paris olympic) स्वप्निल कुसळेच्या (Swapnil Kusale) मार्गदर्शकांनी व्यक्त केलीयं. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज स्वप्निल कुसळे याने कांस्यपदक पटकावून मानाचा तुरा रोवलायं. कांस्यपदक पटाकवल्यानंतर सरकारकडून 1 कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून करण्यात आलीय. त्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये स्वप्निलचे मार्गदर्शक अक्षय अष्टपुत्रे यांनी खंत व्यक्त केलीयं.

उत्तर भारतीय महिलांनाही ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ; निरुपम यांच्यावर जबाबदारी सोपवली

वडिलांनी बॅंकेकडून कर्ज घेऊन प्रोत्साहन दिलं :
स्वप्निल 2009 सालापासून वयाच्या 14 व्या वर्षीपासून नेमबाजीचा सराव करीत आहे. नेमबाजीचा वार्षिक वेळ खर्च अधिक असतो. त्यासाठी रायफल, जॅकेट, बुलेटसाठी बऱ्याच पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत स्वप्निलच्या वडिलांना बॅंकेकडून कर्ज घेऊन मुलाच्या खेळासाठी प्रोत्साहन दिलं. एक बुलेटची किंमत 120 रुपये असायची. त्यामुळे मी नेमबाजीचा सराव करताना प्रत्येक बुलेट काळजीपूर्वक वापरायचो. कारण अधिकचा खर्च परवडणारा नव्हता. मी जेव्हा या खेळासाठी सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे पुरेसं सामानही नव्हतं, असं स्वप्नीलने माध्यमांना सांगितलंय.

Bigg Boss OTT 3 : ‘बिग बॉस ओटीटी 3 फिनाले’चा महाअंतिम सोहळा; कोण जिंकणार ट्रॉफी? उत्सुकता शिगेला

मध्य रेल्वेकडून स्वप्निलचा यथोचित सन्मान :
तब्बल 72 वर्षानंतर स्वप्निल कुसळे याने भारताला वैयक्तिक खेळात भारताला कांस्यपदक मिळवून दिलं आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. स्वप्निल सध्या मध्य रेल्वेच्या पुणे डिव्हीजनमध्ये टीसी म्हणून काम करीत असून भारतात आल्यानंतर राज्य सरकारसह मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने त्याचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. स्वप्निलला ऑफिसर म्हणून प्रमोशन देण्यात येणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केलीयं.

राज्य सरकारकडून 1 कोटींचं बक्षीस :
भारतीय नेमबाज स्वप्निल कुसळेला 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्निल कुसळे याने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. स्वप्निलने कांस्यपदक पटकावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वप्निलसह कुटुंबियांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधलायं.

follow us