Phaltan Doctor Death case : हात जोडले अन् म्हणाला मला..,; PSI गोपाळ बदनेने माध्यमांसोर काय सांगितलं?

फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी पीएसआय गोपाळ बदने याने माध्यमांसमोर आपली पहिली प्रतिक्रिया दिलीयं.

Gopal Badane

Gopal Badane

Phaltan Doctor Death case : एक पीएसआय आणि पोलिस कर्मचाऱ्याच्या छळाला कंटाळून एका महिला डॉक्टरने (Phaltan Doctor Death case) आत्महत्या केल्याची घटना साताऱ्यातील फलटणमध्ये घडली. या प्रकरणात महिला डॉक्टरने आपल्या हातावर या दोन्ही कर्मचाऱ्यांची नावे लिहून पीएसआय प्रकाश बदने याने माझ्यावर चार वेळा अत्याचार आणि पोलिस कर्मचारी प्रशांत बनकरने मानसिक छळ केल्याचा खुलासा महिला डॉक्टरने केलायं. या प्रकरणानंतर पीएसआय गोपाळ बदने फरार होता. अखेर काल बदने स्वत:हून पोलिसांत हजर झाला आहे. पोलिसांच्या एका तासांच्या चौकशीनंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी त्यांनी माध्यमांसमोर हात जोडत मला निष्कारण अडकवलं जात असल्याची पहिली प्रतिक्रिया दिलीयं.

ब्रेकिंग : साराभाई Vs साराभाई फेम अभिनेते सतीश शाह यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गोपाळ बदनेला तपासणीसाठी नेत असताना त्याला पोलिसांच्या गाडीत बसवण्यात आलं. त्याचवेळी तो माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर आला आणि लगेचच हात जोडले. हात जोडत बदने मला मला निष्कारण अडकवलं जात आहे, त्यानंतर फलटण पोलिसांनी त्याला फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. तेव्हा बदने याने ही प्रतिक्रिया दिलीयं. पीएसआय बदने स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस अधिकारी गोपाल बदने याला मेडिकलसाठी रात्री उशिरा नेण्यात आले. आरोपी पीएसआय बदने स्वतःहून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर फलटण शहर पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. पीएसआय गोपाल बदने याची एक तास कसून चौकशी केल्यानंतर त्याला मेडिकलसाठी नेण्यात आले.

दु:खद! विद्यार्थीप्रिय दाम्पत्यावर काळाचा घाला; सेवानिवृत्त प्रा. रामराव माने अन् पत्नी रत्नमाला माने यांचा अपघाती मृत्यू

साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळन आले असून, आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या हातावार सुसाईड करण्याचे कारण नमुद करण्यात आले आहे. यात संबंधित महिला डॉक्टरने दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे आरोप केले. यामुळे मोठी खळबळ उडाली. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देत संबंधित पीएसआय बदनेचं तात्काळ निलंबन तर, बनकरच्या अटकेचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे फिरवत दोन्ही पीएसआय गोपाळ बदने आणि पोलिस प्रशांत बनकर या दोन्ही आरोपींना अटक केलीयं.

Exit mobile version