Download App

फिर से दिखाऊंगा सडक पे खेल…,तो व्हिडिओ बिल्डरपुत्राचा नाहीच

Pune Porsche Car Accident : 19 मे च्या पहाटे नशेत भरधाव कारने दोन जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन बिल्डरपुत्राने जामीन मिळाल्यानंतर पुन्हा एक

Image Credit: Letsupp

Pune Porsche Car Accident : 19 मे च्या पहाटे नशेत भरधाव कारने दोन जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन बिल्डरपुत्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो  रॅप साँग तयार करताना दिसत आहे. या रॅप साँगमध्ये शिवीगाळ करण्यात आले आहे. यामुळे अनेकजण संताप व्यक्त करत आहे.

मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओमध्ये अल्पवयीन बिल्डरपुत्र नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र हा व्हिडिओ कोणी शेअर केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

काय आहे मुलाच्या रॅप साँगमध्ये?

मिली बेल, फिर से दिखाऊंगा सडक पे खेल,

चार यार मेरे साथ, सिधे फाड देते गां+++

करके बैठा मै नशे…

इन माय पोर्शे

सामने आया कपल मेरे अब वो है निचे

साऊंड सो क्लिंचे सॉरी गाडी चढ आप पे

17 साल की उमर

पैसे मेरे बाप पे

1 दिन में मिल गयी मुझे बेल

फीर से दिखा दुंगा सडक पे खेल

प्लेइंगद केरोसिन फोन्क इन माय नेक्स्ट स्पोर्ट्स कार

19 मेच्या पहाटे अल्पवयीन बिल्डरपुत्राने दारूच्या नशेत वेगात पोर्शे कार चालवत दोन जणांना चिरडले होते. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली होती मात्र त्याला दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला होता.

फिर से दिखाऊंगा सडक पे खेल…, बिल्डरपुत्राचा शिवीगाळ करणारं रॅप व्हायरल

मात्र आता या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासानंतर तो सज्ञान आहे की अज्ञान हे ठरवलं जाणार आहे. तोपर्यंत त्याला 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. कल्याणीनगर भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात जामीन मिळालेल्या अल्पवयीन बिल्डर पुत्राला बुधवारी (दि.22) बाल हक्क न्यायालयता हजर करण्यात आले. यावेळी सुनावणीदरम्यान बाल हक्क न्यायालयाने निर्णय दिला.

follow us

वेब स्टोरीज