Download App

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! ‘या’ तारखेला मिळणार PM किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता

  • Written By: Last Updated:

PM Kisan 15th Installment Date: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वीच (Diwali) शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहे. PM किसान सन्मान निधी योजनेच्या 15 व्या हप्त्याची ताऱीख ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याद्वारे या योजनेच्या 15व्या हप्त्याच हस्तांतरण 15 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे.
8 कोटी शेतकऱ्यांचा 15 वा हप्ता DBT द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात हस्तांतरित केला जाईल.

World Cup 2023: क्रिकेटप्रेमींची मने जिंकणाऱ्या ‘अफगाण’चा अखेरच्या सामन्यातही झुंजारपणा ! 

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरूवात केली. या योजनेंतर्गत, सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्ष तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये दिले जातात. दर 4 महिन्यांला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा केला जातो. आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 14 वा हप्ता मिळाला आहे. आता पंधरावा हप्ता कधी मिळणार? याची शेतकरी आतुरतने वाट पाहत आहे.

‘मोदीजी म्हणतात, मी OBC, पण त्यांचाच जात जनगणनेला विरोध’; राहुल गांधीचं टीकास्त्र 

येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसानचा 15 वा हप्ता मिळू शकतो. मागील हप्त्यांमध्ये पीएम किसानच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली होती. कारण अनेकांनी केवायसी प्रक्रियाच केली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ज्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी पूर्ण केलंय त्यांनाच या योजनेचला लाभ मिळणार आहे. तसेच फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती बरोबर असावी. तुमचं नाव, पत्ता, बॅंक खात्याचे तपशील, मोबाईल क्रमाकं चुकीचे असल्यास या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता.

PM किसानच्या 15 व्या हप्त्याचे 2,000 रुपये 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील. ज्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीत आहे, त्यांनाच पंधरावा हप्ता दिला जाईल.

यादीत नाव आहे की नाही

15 वा हप्ता लवकरच जमा करावा होणार असून या यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. तिथे आवश्यक ती तपशील भरल्यानंतर एक यादी दिसेल, त्यात तुमचे नाव शोधा. तुमचे नाव योजनेच्या यादीत असल्यास तुम्हाला हप्ता मिळेल. याशिवाय शेतकरी पंतप्रधान शेतकरी योजना हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

follow us