यवतमध्ये कुटुंबावर प्राणघातक हल्ला! चोरी अन् खुनाचा गुन्हा; परराज्यातील टोळीला पोलिसांनी 12 तासांत केलं जेरबंद

Yavat Crime News Robbery And Murder : दौंड जिल्ह्यातील यवतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जबरी चोरीसह खुन केल्याची घटना समोर (Robbery And Murder) आली आहे. यवतमध्ये जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा करणारी परराज्यातील चौघांची टोळी पोलिसांनी 12 तासांत जेरबंद (Yavat Crime News) केलीय. स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलीसांनी ही कामगिरी केलीय. दौंड तालुक्यातील यवत […]

Crime News

Crime News

Yavat Crime News Robbery And Murder : दौंड जिल्ह्यातील यवतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जबरी चोरीसह खुन केल्याची घटना समोर (Robbery And Murder) आली आहे. यवतमध्ये जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा करणारी परराज्यातील चौघांची टोळी पोलिसांनी 12 तासांत जेरबंद (Yavat Crime News) केलीय. स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलीसांनी ही कामगिरी केलीय.

दौंड तालुक्यातील यवत या गावामध्ये 5 मार्च रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास ही भयंकर घटना घडली. परप्रांतीय चार लोकांनी चव्हाण कुटुंबाचा अतिशय क्रूर आणि गंभीररीत्या घात केलाय. मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना ज्या प्रकारे खुप अमानुष आणि क्रुरपणे मारले, तसेच या चव्हाण कुटुंबातील 4 व्यक्तींना अतिशय अमानुष आणि क्रूरपणे मारण्यात आलंय.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिवाला धोका? व्हाईट हाऊसजवळ बंदुकधारी संशयित, गुप्तचर यंत्रणेने झाडल्या गोळा

कुटुंबातील कर्ता धर्ता अविनाश चव्हाण (वय 34) यांना जाग्यावर डोक्यात वार करून आणि दगड घालून मारण्यात आलंय. त्यांची आई आणि बहीण ह्या खूप सीरियस आहेत. त्यांच्या डोक्यात अन् तोंडावर खूप वार झाले आहेत. हे संपूर्ण कुटूंब संपवण्याच्या हेतुने हा हल्ला झाला आहे, तरी या हल्यात त्यांची पत्नी आणि 3 वर्षाचा मुलगा बचावला आहे. कारण की, त्यांच्या पत्नीने आपल्या मुलासोबत स्वतःला घरातील बाथरूममधे कोंडुन घेतले होते. त्यानंतर शेजारील लोकांना कॉल केला, त्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. तर या फॅमिलीला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी गावकरी करत आहेत.

घडलेल्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं. आरोपींना शोधण्यासाठी यवत पोलिस स्टेशनची दोन पथके, स्थानिक गुन्हे शाखेची पाच पथके तयार करण्यात आली. तपास पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलंय. घटनास्थळाचा परिसर हा दुर्गम आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अभाव होता, घटना झाल्यानंतर तक्रारदार यांनी परिसरातील लोकांना मदतीस फोन केला होता.

‘माझ्या वडिलांना न्याय द्या…’ वैभवी ढसाढसा रडली, थेट बारामतीकरांच्या काळजाला हात घातला

यापैकी काही लोकांनी या चोरट्यांचा पाठलाग केला. यावेळी चोरटे कॅनॉलचे दिशेने रेल्वे रूळाकडे पळून गेल्याचं सांगितलं. पोलिसांनी या परिसरात शोध घेतला, तेव्हा आरोपी पळून गेलेल्या भागामध्ये एक संशयास्पद बॅग आली. त्या बॅगमध्ये कपडे आणि इतर साहित्य मिळालंय. एका जर्किंगवर युनिव्हर्सिटी दिल्ली असं लिहिलं होतं. त्याआधारे आरोपी उत्तर भारतातील असल्याचं निष्पन्न झालंय.

 

Exit mobile version