Download App

आमच्यावर दबाव नाही! दुर्दैवाने कोर्टाने दोन अर्ज फेटाळले; पुणे अपघातावर आयुक्तांची प्रतिक्रिया

आमच्यावर कसलाच दबाव नाही. पुणे अपघातात दुर्दैवाने कोर्टाने दोन अर्ज फेटाळले अशी प्रतिक्रिया पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोघांना चिरडले. यामध्ये अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला आहे. (Pune Accident ) दरम्यान, त्यातील आरोपीला काही वेळातच जामीन मिळाल्याने पोलिसांवर वेगवेगळे आरोप होत आहेत. या सर्व आरोपांना आणि पोलिसांची काय भूमिका आहे याबाद्दल पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

आरोपीला विशेष वागणूक देणाऱ्या पोलिसांसह आरोपीवर कठोर कारवाई करा; पुणे अपघातप्रकरणी फडणवीसांचे आदेश

कुणाचाही दबाव नाही

या प्रकरणात जे दोन जीव गेले त्यांना न्याय निळावा यासाठी पुर्णपणे तपास सुरू आहे. यामध्ये कुणाचाही आमच्यावर दबाव नव्हता, नाही आणि कधीच नसेल अशी प्रतिक्रिा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. तसंच, दुर्देवाने कोर्टाने आमचे काही अर्ज फेटाळले अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र, पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत आम्ही आमचं कर्तव्य बजाबत असतो. आम्हाला कुणाचा दबाव असल्याचं काही कारण नाही असंही ते म्हणाले.

 

Pune Accident News : अटक होण्याच्या भीतीने बिल्डर विशाल अग्रवाल फरार, पोलिसांचा शोध सुरु

दोन अर्ज फेटाळले

आम्ही कोर्टात दोन अर्ज केले होते. त्यामध्ये एक आरोपीला प्रौढ ठरवण्याचा होता आणि दुसरा रिमांड होमचा अर्ज होता. दुर्दैवाने कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले असंही अमितेश कुमार म्हणाले. परंतु, आमची भूमिका ही आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशीच आहे असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, चौकशी केली असता या प्रकरणातील कार चालक दारू प्यायलेला होता हे स्पष्ट झालं आहे असंही अमितेश कुमार म्हणाले आहेत.

follow us