Download App

धक्कादायक! चक्क पोलिसांनी आरोपीकडूनच घेतली दीड कोटींची खंडणी; गुन्हे शाखेचे चार कर्मचारी निलंबित

Police अहिल्यानगर शहरामध्ये पोलिसांनी थेट आरोपींकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी खंडणी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Police took a ransom of Rs 1.5 crore from accused; Four Crime Branch employees suspended in Ahilyanagar : अहिल्यानगर शहरामध्ये पोलिसांनी (Police) थेट आरोपींकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी खंडणी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तुषार छबुराव धाकराव, पोलीस हेडकॉनस्टेबल मनोहर सिताराम गोसावी, पोलीस हेडकॉनस्टेबल बापुसाहेब रावसाहेब फोलाणे व पोलीस हेडकॉनस्टेबल गणेश प्रभाकर भिंगारदे अशा तिघांना निलंबित करण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी ‘ग्रो मोअर इन्व्हेसमेंट फायनान्स’ कंपनीविरोधात दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी भुपेंद्र राजाराम सावळे (वय 27, रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी, ता. राहाता) याला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. मात्र यामध्ये भूपेंद्र सावळेने एक तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 15 जानेवारी 2025 रोजी नाशिककडे जात असताना, एलसीबीचे उपनिरीक्षक तुषार धाकराव व तीन कर्मचार्‍यांनी त्याला लोणीजवळ अडवले. आरबीआय लायसन्सशिवाय गुंतवणूक घेतल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्याच्याकडून 1.5 कोटी रुपये मागितल्याचा धक्कादायक आरोप त्याने केला आहे.

अमृताची ‘सुंदरी’ अमेरिकेतील रंगमंचावर चमकली! पाहा PHOTO

तसेच, आरोपीने दावा केला की, त्याला आणि त्याच्या भावांना जबरदस्तीने पोलीस (Police) अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले व तेथेच एका विशिष्ट बँक खात्यावर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आले. ही संपूर्ण रक्कम उपनिरीक्षक धाकराव यांनी दिलेल्या खात्यावर ट्रान्सफर झाल्याचे तो म्हणाला.

सातासमुद्रापार अमृताच्या नृत्याविष्काराचा डंका! सुंदरी ऑन ग्लोबल स्टेज…

या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस (Police) उपनिरीक्षक व तीन कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये उपनिरीक्षक धाकराव, कर्मचारी मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाणे, गणेश भिगारदे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोडे हे करीत आहेत. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेश काढले आहेत.

नाशिकनंतर पुण्यातही खळबळ! गिरीश महाजनांचे विश्वासू प्रफुल लोढा अडचणीत; आणखी एक अत्याचाराचा गुन्हा

ग्रो मोअर इन्व्हेसमेंट फायनान्स प्रकरणी राहाता पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. तपासादरम्यान, प्रमुख संशयित आरोपी भूपेंद्र सावळे याला अटक करण्यात आली आहे. पोलीस चौकशीत त्याने शेअर बाजारातील नुकसानीमुळे गुंतवणूकदारांचे पैसे परत करता न आल्याचे कबूल केले. मात्र, त्याच वेळ त्याने स्थानिक गुन्हे शाखेतील एक अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांनी दीड कोटी रुपयांची लाच माझ्याकडून घेतली असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.

… तर राजीनामा देतो, रमीच्या व्हिडीओनंतर कृषीमंत्री कोकाटेंनी विरोधकांना घेतलं फैलावर

भूपेंद्र सावळे हा 15 जानेवारीला नाशिककडे जात होता. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस (Police) उपनिरीक्षक तुषार धाकराव व तीन कर्मचाऱ्यांनी त्याला लोणीजवळ अडवले. आरबीआय लायसन्सशिवाय गुंतवणूक घेतल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्याच्याकडून दीड कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्याने केला. तसेच, त्याला आणि त्याच्या भावांना जबरदस्तीने पोलीस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले व तेथेच एका विशिष्ट बँक खात्यावर ऑनलाईन पैसे वर्ग करण्यास भाग पाडण्यात आले. ही संपूर्ण रक्कम उपनिरीक्षक धाकराव यांनी दिलेल्या खात्यावर वर्ग झाल्याचे त्याने सांगितले.

अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला धक्का; शहरप्रमुख काळेंवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, पोलिसांनी केली अटक

दरम्यान, या आरोपांची गंभीरता लक्षात घेता उपनिरीक्षक धाकराव, कर्मचारी मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस (Police) निरीक्षक डॉ. शरद गोर्डे हे करीत आहेत.

follow us