Prajakt Tanpure rise voice for Nagar Manmad Road Even if MP is from the NCP : अहिल्यानगर – मनमाड रस्त्याची झालेली चाळण व यामुळे झालेल्या अपघातामधून अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे तसेच किमान येत्या आठ दिवसांत राहुरी शहरातील रस्ता दुरुस्त व्हावा, असे अल्टिमेटम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. तसेच उचित कार्यवाही झाली नाही तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करणार, भले आम्हाला जेलमध्ये टाका! असा थेट इशारा आता माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. मात्र नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आहे. लंकेच्या अधिपत्याखाली येणाऱ्या या रस्त्यासाठी त्यांच्याच पक्षातील माजी आमदारांना रास्तारोको करण्याची वेळ येत आहे.
‘गाडीने उडवू’, भाजप महिला नेत्याला धमकावलं; युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षासह आठ जणांवर गुन्हा
नगर-मनमाड रस्त्याची दुर्दशा झाल्याबद्दल माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांच्या मते, रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे अपघात होत आहेत आणि या कामात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. तसेच रस्ता दुरुस्ती व्हावा यासाठी तनपुरे यांनी आता राहुरी शहरामध्ये रस्तारोको केला. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अक्षरश चाळणझाली आहे. अनेकदा केवळ डागडुजी या रस्त्याची करण्यात आली. मात्र हा रस्ता काही केल्या पूर्णत्वास गेलेला नाही. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये हा रस्ता प्रश्न चांगलाच गाजला. माजी खासदार राहिलेल्या सुजय विखे यांच्या पराभवाच्या कारणांमध्ये या रस्त्याचा देखील समावेश आहे.
शरद पवारांचा बालेकिल्ला ढासळतोय…गळती रोखण्यात लोकप्रतिनिधींना अपयश
दरम्यान माजी आमदार राहिलेले प्राजक्त तनपुरे हे गेल्या काही दिवसांपासून नगर मनमाड रस्त्यासाठी सातत्याने आवाज उठवत आहे. वेळप्रसंगी आंदोलन देखील करत आहे. हा रस्ता केंद्राकडे हस्तांतरीत आहे. व आणखी एक विशेष म्हणजे खासदारांच्या अधिपत्याखाली येणार हा रस्ता राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी आपण पूर्ण करू असं अनेकवेळा सांगितले. मात्र त्यांच्याशी पक्षातील माजी आमदार राहिलेले तनपुरे या रस्त्यासाठी आंदोलन करत आहे. रस्त्याच्या प्रश्नावरून केंद्रावर व सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहे. मात्र या रस्त्यासाठी अपेक्षित असे जनआंदोलन खासदार म्हणून लंके यांनी उभे केले नाही.
आयुष्मानचा पाचवा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये, ‘थामा’ ने गाठला 100 कोटींचा पल्ला!
किंबहुना अनेक आंदोलने या रस्तासाठी झाले त्या आंदोलनाला देखील भेट देण्यासाठी लंके गेले नसल्याचे देखील समजते आहे. नाण्याची एक बाजू झाली मात्र 2019 ला आघाडीचे सरकार राज्यात आल्यावर प्राजक्त तनपुरे हे आमदार होते तसेच राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी कारभार पाहिला मात्र त्यांच्या काळात देखील या रस्त्याचे काम झालेले नाही. यामुळे लोकप्रतिनिधी यांनी केवळ आंदोलन करून हा प्रश्न मार्गी लागणार नाही यासाठी ठोस पाऊले उचलणे गरजेचं आहे अशी जनभावना आता निर्माण झाली आहे.
आंदोलन, आश्वासन मात्र उपाययोजना कधी?
नगर मनमाड रस्ता दुरुस्तीसाठी तनपुरे यांनी यापूर्वी 8 सप्टेंबर रोजी आंदोलन केलं होत. यावेळी देखील आश्वासन घेत त्यांनी प्रशासनाकडून काम सुरु करण्यात येईल अशी अपेक्षा ठेवली. मात्र आता दोन महिन्यानंतर देखील परिस्थिती जैसे थीआहे. आज पुन्हा एकदा तनपुरे यांनी रस्तारोको केला मात्र याबाबत आता खुद्द खासदार लंके यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत कामाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक देत आहे.
तनपुरे यांचा प्रशासनाला इशारा
महिन्याभरापूर्वी नगर मनमाड रस्ता दुरुस्त करा ही मागणी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो होतो, मात्र आजही अवस्था जैसे थे आहे. एका आठवड्यात आठ बांधवांचा मृत्यू राहुरीकरांनी पाहिला. मात्र प्रशासनाला जाग येईना. राहुरी शहरातून जाणाऱ्या हायवेची अवस्था काही वेगळी नाही. अर्धा फुटांचे खड्डे रस्त्यावर पडले आहेत. त्यात पाणी साचल्याने खड्ड्यांच्या खोलीचा अंदाजही येत नाही. शहरवासीयांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दुर्दैवाने काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? येत्या आठ दिवसांत किमान शहरातील रस्ता दुरुस्त व्हावा, असे अल्टिमेटम NHAI च्या अधिकाऱ्याला दिले आहे. उचित कार्यवाही झाली नाही तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करणार, भले आम्हाला जेलमध्ये टाका! असा इशारा माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.
