Download App

VIDEO : ‘माझ्या आनंदावर विरजण…’ त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही; प्राजक्ताने सांगितलं…

  • Written By: Last Updated:

Prajakta Mali Not Attend Trimbakeshwar Mandhir : महाशिवरात्रीनिमित्त (MahaShivratri) आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. देशभरातील बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Mandhir) सुद्धा महाशिवरात्रीनिमित्त आज एका विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलंय. यंदा महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिराच्या प्रांगणामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नटरंग अकादमीच्या वतीने शिवार्पणनस्तु नृत्य सादर करणार होती. परंतु, प्राजक्ता माळीच्या या कार्यक्रमाला विरोध सुद्धा करण्यात आला होता.

50 लाख डॉलर्स द्या अन् अमेरिकचे नागरिक व्हा…डोनाल्ड ट्रम्पची ‘खास’ योजना

माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी प्राजक्ता माळीच्या सादरीकरणाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर प्राजक्ताने या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलंय. उपस्थित झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्राजक्ताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिले आहेत.

व्हिडिओमध्ये प्राजक्ता म्हणतेय की, नमस्कार! सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमाला फार प्रसिद्धी द्यायची नाही, असं ठरलं होतं. कारण मंदिराचं प्रांगण तिथलं क्षेत्रफळ. तिथे किती माणसं कार्यक्रम पाहण्यासाठी बसु शकतात, या सगळ्या गोष्टींचा विचार करता मी देखील सोशल मीडियावर यासंबंधी माहिती दिली नव्हती. प्रसिद्धी दिली नव्हती.

तुम्ही सुद्धा ऑफिसमध्ये डुलकी घेता? हायकोर्टाचा ‘हा’ निर्णय तुमच्यासाठीच, वाचा सविस्तर…

परंतु काल दिवसभरात या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे आता अवास्तव गर्दी, काळजी सगळ्यांच्या मनात आहे. त्याचमुळे माझ्या कुटुंबियांशी बोलून मी हा निर्णय घेतेय. कमीटमेंट आहे, त्यामुळे तो कार्यक्रम होईल. माझे सहकलाकार माझ्याशिवाय तो कार्यक्रम सादर करतील. अर्थातच यामुळे माझ्या आनंदावर विरजण पडणार आहे.

परंतु वैयक्तिक सुखापेक्षा आपल्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येवू नये, ही बाब मला जास्त महत्वाची आणि मोठी वाटते. त्यामुळे हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. जिथे भाव असतो तिथे देव असतो. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी कुठेही बसुन शिवाची आराधणा केली, तरी ती शिवापर्यंत पोहोचणार आहे. तिथे कोणाचाही हिरमोड होवू नये, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे, असं प्राजक्ताने सांगितलंय.

 

follow us