तुम्ही सुद्धा ऑफिसमध्ये डुलकी घेता? हायकोर्टाचा ‘हा’ निर्णय तुमच्यासाठीच, वाचा सविस्तर…

तुम्ही सुद्धा ऑफिसमध्ये डुलकी घेता? हायकोर्टाचा ‘हा’ निर्णय तुमच्यासाठीच, वाचा सविस्तर…

Can We take Powenap On Duty In Office : ऑफिसमध्ये काम करताना तुम्ही झोपता का? ऑफिसमध्ये (Office) काम करताना डुलकी घेतल्याने तुमचे सहकारी किंवा बॉस तुम्हाला चिडवतात का? जर असं असेल तर तुम्ही उच्च न्यायालयाचा हा निर्णय तुमच्यासाठी आहे. कर्नाटकातील (Karnataka High Court) एका कॉन्स्टेबल चंद्रशेखरचा पॉवरनॅप व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्याला नोकरीवरून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर, न्यायालयात कॉन्स्टेबलने मांडलेल्या युक्तिवादांवर, (Powernap In Office) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितलं की संविधान लोकांच्या झोपण्याच्या आणि विश्रांतीच्या अधिकाराला मान्यता देते. वेळोवेळी विश्रांती आणि झोपेच्या महत्त्वावर भर देते. न्यायाधीशांनी पुढे म्हटलंय की, त्यामुळे या प्रकरणात कामावर असताना झोपल्याबद्दल याचिकाकर्त्याला दोषी ठरवता येणार नाही.

कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ (KKRTC) मध्ये वाहतूक हवालदार असलेले चंद्रशेखर यांना सलग दोन महिने 16 तासांच्या शिफ्टमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी 10 मिनिटांची झोप घेतल्याबद्दल निलंबित करण्यात आलं. आता या प्रकरणात कॉन्स्टेबलला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाय. केकेआरटीसीने जारी केलेला निलंबन आदेश न्यायालयाने रद्द केलाय. न्यायमूर्ती एम नागाप्रसन्ना म्हणाले की, केकेआरटीसी व्यवस्थापनाची चूक आहे. कारण त्यांनी कॉन्स्टेबलला दोन महिने ब्रेकशिवाय दिवसातून दोन शिफ्टमध्ये काम करण्यास भाग पाडले.

उन्हाचा चटका वाढला; हवामान विभागाने मुंबईसह ‘या’ सहा जिल्ह्यांना दिला उष्णतेच्या लाटेचा इशारा

उच्च न्यायालयाने आदेश दिलाय की, याचिकाकर्त्याला पगारासह सर्व फायदे मिळतील. जर याचिकाकर्ता ड्युटीवर असताना शिफ्टमध्ये झोपला असता तर ते निश्चितच चुकीचे ठरले असते. न्यायाधीशांनी सांगितलंय की, या प्रकरणात याचिकाकर्त्याला 60 दिवसांसाठी ब्रेकशिवाय दररोज 16 तास काम करण्यास भाग पाडण्यात आले. चंद्रशेखर 13 मे 2016 रोजी कोप्पल विभागात कर्नाटक राज्य परिवहन कॉन्स्टेबल म्हणून नोकरीत रुजू झाले. 23 एप्रिल 2024 रोजी एका अहवालात आरोप करण्यात आला होता की, याचिकाकर्ता कामावर झोपलेला आढळला. 1 जुलै 2024 रोजी चंद्रशेखर यांना निलंबित करण्यात आलं.

चंद्रशेखर यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला की, त्यांना झोपण्याची संधीही दिली जात नव्हती. कारण त्यांना सतत दोन महिने सलग शिफ्टमध्ये काम करण्यास भाग पाडले जात होते. म्हणूनच ते कामावर झोपी गेले. केकेआरटीसीने असा युक्तिवाद केला की, याचिकाकर्त्याच्या ड्युटीवर झोपण्याच्या व्हिडिओमुळे महामंडळाचे नाव बदनाम झालंय.

माजी कब्बड्डी कर्णधारवर पत्नी बॉक्सर स्वीटी बुराचा मारहाणीचा आरोप; पोलिसांत काय दिली तक्रार?

न्यायमूर्ती नागाप्रसन्ना यांनी नमूद केलंय की, केएसटी कॉन्स्टेबलचे कामाचे तास दिवसाचे आठ तास असतात. कामाचा ताण जास्त असल्याने चंद्रशेखर यांना दोन शिफ्टमध्ये काम करण्यास सांगण्यात आलंय. मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणेच्या कलम 24 मध्ये म्हटलंय की, प्रत्येकाला विश्रांती आणि विश्रांतीचा अधिकार आहे. यामध्ये कामाच्या तासांची वाजवी मर्यादा आणि पगारासह नियतकालिक सुट्ट्या समाविष्ट आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना देखील काम-जीवन संतुलन मान्य करते. अपवादात्मक परिस्थिती वगळता, कामाचे तास आठवड्यातून 48 तास आणि दिवसाला 8 तासांपेक्षा जास्त नसावेत.

न्यायाधीशांनी पुढे म्हटलंय की, केकेआरटीसीला स्वतःच्या चुकीमुळे निलंबित करण्याची कारवाई निःसंशयपणे सद्भावनेच्या अभावामुळे झालेली कृती आहे. हा आदेश रद्द करावा. याचिकाकर्त्याला सेवेत सातत्य राखण्याचा आणि निलंबनाच्या कालावधीसाठी वेतनासह सर्व परिणामी लाभ मिळण्याचा अधिकार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube