Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजपची ‘बी टीम’ असा आरोप करणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला (Congress-NCP) इशारा दिला आहे. ते म्हणाले की, जर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आम्हाला भाजपची ‘बी टीम’ म्हणत असेल तर मी तोंड उघडेल तेव्हा तुम्ही कुठेही राहणार नाही.’ आंबेडकर हे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे.
‘ती’ वेळ आणू नका अन्यथा…
आगामी लोकसभा आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर (Congress-NCP) टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही 48 जगांची तयारी केलीय पण जर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आम्हाला भाजपची ‘बी टीम’ म्हणत असेल तर मी तोंड उघडेल तेव्हा तुम्ही कुठेही राहणार नाही. मी तुमचे काय-काय संबंध आहेत. ते मी बाहेर काढेन त्यामुळे त्यांनी माझ्यावर ती वेळ आणू नका. अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
दोन नेत्यांच्या सांगण्यावरून नोटीस; रोहित पवारांच्या आरोपावर अजितदादा म्हणाले, ‘अकारण नोटीस…’
शरद पवार हे जर अदानींची भेट घेत असतील तर राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसबाबत निर्णय घ्यावा. तो त्यांनी घेतला नाही. तर त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता नाही हे सिद्ध होतं. कारण अदानींच्या निमित्ताने राहुल गाधींनी स्वतः ला ट्रायलवर ठेवले आहे. तर दिवाळीनंतर देशात गो हत्या, लव्ह जिहाद अशा विविध मुद्द्यांवरून दंगली घडतील पण जनतेना त्याला खतपाणी घालू नये. तसेच वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीवर उद्धव ठाकरेंनाच विचारा असं यावेळी प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.
मुंबईतील संस्कृतीला भाजप आणि कॉंग्रेस जबाबदार…
पुढे त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर म्हटलं की, राजकरण्यांनी मुंबईतील संस्कृतीला कमकुवत करून मुंबईला विविध राज्यांतील लोकांचं एक बेट बनवलं आहे. त्याला जबाबदार भाजप आणि कॉंग्रेसही आहे. आम्ही यासाठी भूमिका देखील घेतली होती. की, बाहेरून मुंबईत येणाऱ्यांना 5 वर्ष कोणतही वाहन घेतलं दिलं जाऊ नये. मात्र बाहेरच्या लोकांना जास्त प्रोत्साहन दिलं गेलं. असा आरोप यावेळी आंबेडकरांनी केलं.
Kiran Mane: किरण मानेंची ‘बिग बॉस’च्या आठवणीत भावुक पोस्ट; म्हणाले, अजूनबी विश्वास..
तर मुस्लिम आरक्षणावर बोलताना ते म्हणाले की, मुस्लिम आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे ते देण्यात यावं हे मुस्लिमांनाच कळत नाही. तसेच ते कॉंग्रेस राष्ट्रवादीला का मतं देत आहेत हे देखील कळायला हवं. तसेच महिला आरक्षण हे माझ्या आजोबांनीच दिलं आहे. तर यावेळी कंत्राटी शाळांवर बोलताना आंबेडकर म्हणाले मग मुख्यमंत्री देखील कंत्राटवर असायला हवा.
हृदयद्रावक! गुगल मॅपवर डोळे झाकून विश्वास ठेवणं भोवलं; वाढदिवसादिवशीच डॉक्टरवर ओढावला मृत्यू
तसेच मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या अशोक चव्हाण, शरद पवार नारायण यांनी उत्तर द्यावं. आमचं दलित मराठ्यांना समर्थन आहे. तर ओबीसी आरक्षणात देखील कोणताही हस्तक्षेप केला जाऊ नये. त्यामुळे आरक्षण हवं असणाऱ्यांनी वंचितसोबत यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
Nitesh Rane यांचा कोविड घोटाळ्यानंतर आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ लंडन दौऱ्यावरही इशारा
तर यावेळी आगामी लोकसभा आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही 48 जगांची तयारी केलीय पण जर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आम्हाला भाजपची टीम बी म्हणत असेल तर मी तोंड उघडेल तेव्हा तुम्ही कुठेही राहणार नाही. मी तुमचे काय-काय संबंध आहेत. ते मी बाहेर काढेन त्यामुळे त्यांनी माझ्यावर ती वेळ आणू नका. अशा शब्दांत आंबेडकरांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.