Nitesh Rane यांचा कोविड घोटाळ्यानंतर आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ लंडन दौऱ्यावरही इशारा
Nitesh Rane : नितेश राणे (Nitesh Rane ) यांनी मुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळ्यानंतर आता आदित्य ठाकरेंच्या ( Aaditya Thackery ) मविआच्या काळातील लंडन दौऱ्यावरही इशारा दिला आहे. यावेळी त्यांना ठाकरे कुटुंब आणि राऊतांवरही निशाणा साधला. त्याचबरोबर त्यांनी यावेळी कोविड घोटाळ्यासह ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर केलेल्या टीकेचाही समाचार घेतला. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या मविआच्या काळातील लंडन दौऱ्याविषयी माहिती समोर आणण्याचा इशारा दिला आहे.
‘सर्वोच्च न्यायालय सोडलं तर सगळं…; संजय राऊतांची भाजपवर घणाघाती टीका
काय म्हणाले नितेश राणे?
महाविकास आघाडीचं सरकार असताना आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते. त्यावेळी त्यांनी दावोस नंतर लंडन दौरा केला होता. त्यावर राणेंनी (Nitesh Rane ) टीका करताना म्हटले की, आदित्य ठाकरे हे युती सरकारने राज्यात आणत असलेल्या महाराजांच्या वाघनखांवर प्रश्न विचारत आहेत. त्यांनी तेव्हा त्यांचं सरकर होतं लंडन दौरे करत होतात पण वाघनखं नाही आणली. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यावर प्रश्न विचारता मग तुमचा जो मविआच्या काळात लंडनचा दौरा झाला. त्याची माहिती द्या ती एका आठवड्यात दिली नाही तर मी ती फोटोंसह जाहीर करेन. असा इशारा नितेश राणे यांनी आदित्या ठाकरे यांना दिला आहे.
कर्नाटकात गेलेल्या सोलापूरच्या डीजे ऑपरेटरला मारहाण; काय आहे नेमकं प्रकरण?
त्यांनी पुढे असं म्हटलं की, वरूण सरदेसाई कोणत्याही शासकीय पदावर नसताना त्या दौऱ्यावर कसे काय गेले? त्यांचा खर्च कोणी केला? तेथे ते कोणते पेय घ्यायचे याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. तसेच दावोस दौरा पर्यावरण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांनी कोणत्या अधिकाराने केला. त्यानंतर केलेला लंडन दौरा कोणाच्या खर्चातून केला?
विमानात नवजात बाळाला श्वसनाचा त्रास; मराठमोळा IAS अधिकारी 6 महिन्याच्या मुलासाठी ठरला देवदूत
कारण ठाकरे कुटुंब कधीही स्वतः चे पैसे खर्च करत नाही. त्यामुळे आमच्या सरकारवर टीका करण्यापेक्षा स्वतः चं बघा. तसेच भाजप आणि सरकारवर टीका करत राहिले तर आठवड्यात तुमचा जो मविआच्या काळात लंडनचा दौरा झाला. त्याची माहिती द्या ती एका आठवड्यात दिली नाही तर मी ती फोटोंसह जाहीर करेन. कारण त्या दौऱ्याचा आणि दावोसचा संबंध नव्हता. असा इशारा राणे (Nitesh Rane ) यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.