Prakash Ambedkar : राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजातील प्रस्थापितांवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवातील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वााखाली हे उपोषण सुरू आहे. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलचं पेटलं आहे.
आंबेडकरांचा प्रस्थापित मराठ्यांवर आरोप…
मराठी आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रस्थापित मराठ्यांवर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यातील प्रस्थापित निजामी मराठ्यांनी समान्य मराठ्यांच्या आरक्षणासाठी काहीच केले नाही. कारण जर सामान्य मराठा स्वतःच्या पायावर उभा राहिला तर निजामी मराठ्यांसाठी ते चॅलेंज होईल म्हणून प्रस्थापित निजामी मराठ्यांनी समान्य मराठ्यांसाठी काहीच केले नाही. असा आरोप आंबेडकरांनी केला आहे.
त्याचबरोबर त्यांनी यावेळी मराठा नेत्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले, मराठा आरक्षण देण्यात येऊ नये अशीच भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे. सत्तेत असलेले निजामी मराठा सामान्य मराठ्यांना आरक्षण देऊ देणार नाही. तर सामान्य मराठ्यांना सामाजाला आरक्षणाची गरज आहे. तसेच प्रस्थापित श्रीमंत मराठा समाजापेक्षा वेगळी राजकीय ओळख निर्माण करण्याची देखील गरज असल्याचं आंबेडकर म्हणाले.
DSP-Ajay Devgan: ‘दृश्यम २’ नंतर रॉकस्टार डीएसपी अन् अजय देवगण पुन्हा एकत्र
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 16 वा दिवस आहे. मात्र, आज काही निर्णय होईल का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. यातच मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना फोन करून त्यांच्याबरोबर जवळपास 15 मिनिटे चर्चा केली. दोघांत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समोर आली नसली तरी सकारात्मक चर्चा झाली असे जरांगे यांनी सांगितले.