Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडील मोठं यश मिळालं. (Uddhav Thackeray) मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही चांगल्या जागा मिळाल्या आहेत. (Shiv Sena) त्यावर उद्धव ठाकरे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. दरम्यान, त्यांनी आभार मानताना ज्यांच्या उल्लेख केला त्यामध्ये दलित आणि बौद्ध हा उल्लेख केला नाही. (Prakash Ambedkar) त्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकरांनी ट्वीट करत टीका केली आहे. गरज सरो वैद्य मरो अशा शब्दांत आंबेडकरांनी यावर भाष्य केलं आहे.
आता शहाणे व्हा रविंद्र वायकरांचा विजय हा एक आदर्श घोटाळा; अनेकांचं नावं घेत राऊतांची थेट चौकशीची मागणी
उच्चवर्णीय हिंदूंनी भाजपाला मतदान केलं आणि उबाठा शिवसेना किंवा महाविकास आघाडीला नाही. या निवडणुकीत दलित, मुस्लिम, बौद्ध, ख्रिचन, बहुजन यांनी ऊबाठा शिवसेनेला आणि मविआला मतदान केलं. पण तुमचे पक्ष वाचवण्यात दलीत, बौद्ध यांच्या भूमिकेचा उल्लेख सुद्धा करावासा वाटत नाही. ही खरी त्यांची मानसिकता असंही प्रकाश आंबेडर म्हणाले आहेत. तसंच, दलित आणि बौद्धांनो आता शहाणे व्हा. तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलेत पण तुम्ही त्यांच्या खिजगणतीतही नाही, असं आंबेडकर म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्मीयांनी मतदान केलं. ज्यामध्ये मराठी होते, हिंदू होते, मुस्लीम होते आणि ख्रिश्चनदेखील होते, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या वक्तव्यात दलित आणि बौद्ध समाजाचा उल्लेख नसल्यानं सोशल मीडियावर अनेकजण नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या तीन लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अनुक्रमे संजय दिना पाटील, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.
वंचितची पाटी कोरी पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीची धडक, पाच जणांचा मृत्यू
गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित-एमआयएम फॅक्टर प्रचंड प्रभावी ठरला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले होते. या पराभूत नेत्यांमध्ये काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा समावेश होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित-एमआयएम युतीचे इम्तियाज जलील खासदार झाले होते. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितचा प्रभाव तितकासा जाणवला नाही. एकाही जागेवर वंचितचा उमेदवार विजयी झाला नव्हता.