Download App

सरकारकडून घटनेचे धिंडवडे, ओबीसी अध्यादेशाविरोधात कोर्टात लढणार; प्रकाश शेंडगे आक्रमक

  • Written By: Last Updated:

Prakash Shendage : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अक्षरश: निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर अध्यादेश जारी करण्यात आला. यात मराठा समाजासाठी जरांगेंनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. हा अध्यादेश निघाल्यानंतर ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध करायला सुरूवात केली. केली. यावर आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendage) यांनीही प्रतिक्रिया दिली. हा सामाजिक न्यायाच्या लढ्यातील काळा दिवस आहे. ओबीसींनी न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कोर्टात जाऊ, असं ते म्हणाले.

भाजपाचा इलेक्शन मोड! राज्यांत नेमले प्रभारी, जावडेकरांकडे केरळची जबाबदारी 

शेंडगे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की, आजचा दिवस हा राज्याच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यातील भटक्या विमुक्तांसाठी काळा दिवस आहे. राज्यात 54 लाख कुणबी दाखले सापडल्याचं राज्य सरकारने सांगितलं. त्यानंतर सरकारने मराठ्यांना कुणबीचे दाखले देऊन उघडपणे हे षडयंत्र केलं आहे. राज्य सरकार मराठा समाजाच्या दडपणाखाली आले आहे. कलम दोन एचमध्ये रक्त नातेसंबंधी आरक्षण होतं. मात्र, नियम धाब्यावर बसवला. आता हा निर्णय OBC, SC, ST या सर्व समाजाला लागू होईल, असा कायदा केला आहे, अशी टीका शेंडगे यांनी केली.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला साखरपुडा अन् आता अयोध्येतच लग्नगाठ बांधणार ‘हे’ साऊथ कपल 

ते म्हणाले, हा निर्णय कुणालाही मान्य होणार नाही, शपथपत्र देऊनही आरक्षण मिळेल, अशी परिस्थिती निर्माण तयार केली आहे. मराठा समाजाला खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला. यातून घटनेचे धिंडवडे काढण्यात आलेत. या अध्यादेशावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. यावर 3 कोटी बांधव आक्षेप घेतील. सरकारच्या या निर्णयाला दलित संघटनाही विरोध करतील, सरकारने या अध्यादेशाद्वारे सर्वच समाजाला अंगावर घेण्याचे काम केले आहे. मात्र, आम्ही वकिलांशी चर्चा केली आहे. आता 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागू आणि कोर्टात लढा लढू, असं शेंडगे म्हणाले. या आदेशाची होळी कर मुंबईत मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला.

Parner News : आम्ही भेटलो की चर्चा तर होणारच... शिंदे-लंके पुन्हा एकत्र | LetsUpp Marathi

2024 निवडणुकीत धडा शिकणार
शेंडगे म्हणाले की, EWS आरक्षण हक्काचे आहे. त्यामुळे जो कुणबी दाखला घेईल तो या पासून वंचित होईल. मराठा समाजाचा आज फायदा झालाय की, नुकसान झाले आहे याचा विचार केला पाहिजेय सरकारने आम्हाला आश्वासन दिले होते की ओबीसी आरक्षण याला धक्का लावणार नाही. पण, सरकारने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आता या सरकारला खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही. आम्ही आता नवा राजकीय पर्याय नवीन उभा कररून 2024 निवडणुकीत धडा शिकवू, असंही शेंडगे म्हणाले.

 

 

follow us