भाजपाचा इलेक्शन मोड! राज्यांत नेमले प्रभारी, जावडेकरांकडे केरळची जबाबदारी
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्या आहेत. या निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार नियोजन केले जात आहे. निवडणुकीआधी भाजपाने विविध (BJP) राज्यांमध्ये प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी नियुक्त्या केल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांची सही असलेली यादी पक्षाने प्रसिद्ध केली आहे. या यादीत 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रभारी आणि सहप्रभारींच्या नावांचा समावेश आहे. या यादीतील अनेक नावे आधीचीच आहेत. या यादीवर नजर टाकली तर लक्षात येते की भाजपाने पश्चिम बंगालवर (West Bengal) जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाने राज्यातील तीन नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे.
Lok Sabha 2024 : माजी पंतप्रधान देवेगौडांची मोठी घोषणा; म्हणाले, मी लोकसभा निवडणुकीत..
युपी-बिहारमध्ये कोण
या यादीनुसार उत्तर प्रदेशात बैजयंत पांडा, उत्तराखंडमध्ये दुष्यंत कुमार गौतम, बिहारमध्ये विनोद तावडे, खासदार दीपक प्रकाश, झारखंडमध्ये लक्ष्मीकांत वाजपेयी यांची नावे आहेत. हरियाणात बिप्लव कुमार देव आणि सुरेंद्र नागर, हिमाचल प्रदेशचे श्रीकांत शर्मा आणि संजय टंडन, जम्मू काश्मीर तरुण चुग आणि आशिष सूद, पंजाबसाठी विजय रुपाणी, नरिंदर सिंग तसेच पश्चिम बंगालसाठी मंगल पांडे, अमित मालवीय आणि आशा लाक्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
केरळसाठी प्रकाश जावडेकर
मध्य प्रदेशात डॉ. महेंद्र सिंह, सतीश उपाध्याय, ओडिशासाठी विजयपाल सिंह तोमर, लता उसेंडी, पुदुच्चेरीमध्ये निर्मलकुमार सुराणा, सिक्कीमसाठी दिलीप जैस्वाल यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाच्या यादीत तामिळनाडूमध्ये अरविंद मेनन आणि सुधाकर रेड्डी, केरळमध्ये प्रकाश जावडेकर, कर्नाटकसाठी राधामोहन दास अग्रवाल, लक्षद्वीपमध्ये अरविंद मेनन यांचे नाव आहे. अंदमान आणि निकोबारसाठी सत्या कुमार आणि अरुणाचल प्रदेशसाठी अशोक सिंघल यांची नावे आहेत.
Lok Sabha Election : ‘तर मग भाजपने काय करायचे?’ शिंदे गटाच्या खासदाराचा अजितदादांना सवाल