Lok Sabha 2024 : माजी पंतप्रधान देवेगौडांची मोठी घोषणा; म्हणाले, मी लोकसभा निवडणुकीत..

Lok Sabha 2024 : माजी पंतप्रधान देवेगौडांची मोठी घोषणा; म्हणाले, मी लोकसभा निवडणुकीत..

Lok Sabha Election 2024 : देशात आता लोकसभा निवडणुका जवळ आल्या (Lok Sabha Election 2024) आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. जागावाटपाच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच कर्नाटक राज्यातून (Karnataka) मोठी बातमी समोर आली आहे. माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे (सेक्युलर) नेते एच. डी. देवेगौडा  (HD Deve Gowda) यांनी निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. देवेगौडा म्हणाले, आता मी 90 वर्षांचा झालो आहे. आम्हाला ज्या काही जागा मिळतील ज्या ठिकाणी माझी गरज असेल त्या ठिकाणी मी जाईन. माझी स्मरणशक्ती अजून चांगली आहे आणि निवडणुकीत प्रचार मात्र मी करणार आहे.

Shirur Loksabha Constituency : पार्थ पवार आज दिवसभर हडपसरमध्ये; शिरूरचं जवळपास ठरलंय!

जेडीएस अध्यक्ष एचडी कुमारस्वामी निवडणूक लढतील का या प्रश्नाचे उत्तर देताना देवेगौडा म्हणाले, याबाबत अजून काहीच निर्णय झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे सांगतील त्याचे पालन केले जाईल. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेआधी नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या अनुष्ठानाचे देवेगौडा यांनी कौतुक केले. 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचेही देवेगौडा यावेळी म्हणाले.

दरम्यान, चार महिन्यांपूर्वी जेडीएसचे प्रमुख व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी जेडीएस एनडीएत सहभागी झाला होता. तसेच आगामी लोकसभा निवडणुका एकत्रित लढणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते.

Lok Sabha Election 2024: अखेर जेडीएसची भाजपबरोबर युती ! लोकसभा निवडणूक एकत्र लढणार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप व जेडीएसला मतदारांनी नाकारले आहे. दक्षिणेकडील एकमेव कर्नाटक राज्य भाजपच्या ताब्यात होते.हे राज्य ताब्यातून गेल्याने भाजपच्या दक्षिण मोहिमेला धक्का बसला आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीसाठी जेडीएसबरोबर भाजपने युती केली आहे. लोकसभेच्या दृष्टीने हे राज्य भाजपसाठी महत्त्वाचे आहे. लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु लोकसभेची किती जागा कोणत्या पक्ष लढणार आहे,याबाबत मात्र दोन्ही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

जागा वाटप निश्चित नसले तरी भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांनी युतीमुळे कर्नाटकमधील 25 ते 26 जागांवर आमचा विजय होऊ शकतो, असे जाहीर केले होते. जेडीएस पक्षाला लोकसभा निवडणुकीत चार जागा दिल्या जातील, असे येडियुरप्पा यांनी जाहीर केले आहे. परंतु कुमारस्वामी यांनी जागा वाटप झाले नसल्याचे स्पष्ट केले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज